पान:मराठी रंगभुमी.djvu/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेअभिप्राय.
रा. केसरीकार यांचा अभिप्राय.

 रा. रा. आप्पाजी विष्णु कुलकर्णी यांनीं लिहिलेलं 'मराठी रंगभूमी' हें पुस्तक आमच्याकडे अभिप्रायास आलें आहे . महाराष्ट्र देशांत पेशवाईतील लळितापासून तो हल्लींच्या संगीत नाटकापर्यंत नाट्यकलेची अभिवृद्धि कसकशी होत गेली, त्यांत पुढे सुधारणा कोणत्या दिशेनें झाली पाहिजे, वगैरे गोष्टींचें ह्या ग्रंथांत ऐतिहासिक दृष्ट्या विवेचन केलेलें आह. अशा प्रकारचा ग्रंथ मराठी भाषेत हा पहिलाच होय; व त्यांतील माहिती शोधपूर्वक एके ठिकाणीं केल्याबद्दल रा. कुलकर्णी यांचें आम्ही अभिनंदन करितों. नाट्यकला किंवा नाटकें हीं एक मनोरंजनाचें उत्कृष्ट साधन होय ही गोष्ट सर्वमान्य आहे. कविता ह्या नात्यानें एखाद्या नाटकाचे गुण कितीही चांगले असले तरी सदर नाटकाचा प्रयोग होऊन त्यापासून होणारें मनोरंजन ह्यांत पुष्कळ भेद आहे; आणि मराठी रंमभूमि या विषयावर लिहिणाऱ्या ग्रंथकारास ह्यापैकीं दुसऱ्या प्रकारचें मनोरंजन कशा प्रकारें होतें हें पाहणें आहे. रा. कुलकर्णीं यांनीं आपला ग्रंथ लिहितांना ही गोष्ट ध्यानांत ठेविली आहे; आणि कांहीं नाटकांच्या गुणदोषांबद्दल जरी ह्यांत टीका आहे तरी अभिनय, संगीत, देखावे, पात्रांचा मेळ, इत्यादि मनोरंजनाचीं जीं निरनिराळीं साधनं आहेत त्यांचा जितक्या पृथक्पणें विचार करावयास पाहिज तितका त्यांनी केलेला आहे. कालाच्या मानानें लोकांची रुचि बदलत जाणें अगदीं स्वाभाविक आहे व ही रुचि कसकशी बदलत गेली ह्याचा नुसता इतिहासही भावी दिशाचा एक प्रकारे द्योतक असतो. परंतु हल्लींच्या ग्रंथांत नुसता इतिहासच आहे असें नाहीं, तर पुढील सुधारणेचें धोरणही त्यांत दाखविलें आहे . आम्हीं वर सांगितलेंच आहे कीं, नाटके हीं लोकांच्या करमणुकीचे एक प्रधान साधन आहे; आणि धनुष्य ज्याप्रमाणें नेहमीं बांकवून ठेवणें प्रशस्त