पान:मराठी रंगभुमी.djvu/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
मराठी रंगभूमि.

प्रयोग इंग्रजीत करून दाखविला. या प्रयोगाचे शिक्षण देण्याचे काम सार्जंट केम्स्टर नावाच्या एका युरोपियन मनुष्याने केले असून तो प्रयोग आनंदोद्भव थिएटरमध्ये करण्यांत आला होता. पुण्यास सुशिक्षित मंडळीकडून नाटकगृहांत झालेला हा पहिलाच प्रयोग. हा प्रयोग उत्तम वठला होता असें तो पाहणाऱ्या कित्येक इसमांचे मत आहे.* इंग्रजी नाटकांच्या प्रयोगा- प्रमाणेच त्यावेळी वेणीसंहार, मृच्छकटिक, मुद्राराक्षस वगैरे संस्कृत नाटकांचेही प्रयोग या उच्चप्रतीच्या पाठ- शाळांतून होऊ लागले; व त्यांत काम करणारे इसम सुशिक्षित आणि विद्वान् असल्यामुळे ते प्रयोगही मोठ्या बहारीचे झाले.


 * या प्रयोगांत कोणी कोणी काय काय सोगें केली होती याची माहिती मिळाली ती येणेप्रमाणे:-
१ शंकरराव पाटकर-ड्यूक, लान्सलाट गयो, टबल, यांची कामे.
२ गोविंदराव जोशी-ओल्ड गबो.
3 बळवंतराव करंदीकर-पोशिया.
४ रघुनाथराव साठे-नरीसा.
५ ब. के. भोवळकर- फूल.
६ बापूराव नाटेकर-बेसॉनिया.
७ नारायणराव सोमण-अँटोनियो.
८ नारायणराव आवस्ती-शायलॉक.
 वेणीसंहार नाटकामध्ये प्रख्यात निबंधमालाकार कै. विष्ण- शाखी चिपळणकर यांनी धर्मराजाचे सोंग केले होते; व उत्तरराम- चरितामध्ये कै.वा. शि. आपटे यांनी सातेची भूमिका घेतली होती.