Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१
भाग १ ला.

वल्कलें नेसावयास पाहिजे होतीं तीं ४०० रुपये खर्च करून मुद्दाम मद्रासहून आणलीं होती; व पुष्पशय्येकरितां पुण्याहून फुलांच्या दोन वेंगन्स भरून नेल्या होत्या!
 नाट्यकलेकडे मुंबईतील नव्या सुशिक्षित विद्वानांचें व कलेिजांतील प्रौढ़ विद्यार्थ्याचें जसे लक्ष लागलें होतें तसेंच पुण्यांतील लोकांचें व विद्यार्थ्यांचेंही लागलें होतें; व विद्यार्थ्यांना इंग्रजी नाटकांचें रहस्य समजून देण्याकरितां कॉलेजांत कांहीं युरोपियन नटही मुद्दाम बोलावीत असत. अशा तऱ्हेचे 'मिस एल्शिया मे' व 'प्लेअर ल्को' या नांवाच्या दोन नटांस एकदां डेकन कॉलेजमध्यें बोलावून व त्यांना ५०० रुपये देऊन त्यांच्याकडून कांहीं नाटकें वाचून घेतलीं होती असें सांगतात. पुण्यांत इ. स. १८७२ च्या सुमारास विश्रामबाग हायस्कूलच्या चौकांत त्या शाळेतील विद्यार्थ्यांनीं 'जुलिअस सीझर' नामक नाटकाचा प्रयोग इंग्रजोंत पहिल्यानें केला. या नाटकाच्या प्रयोगास प्रयेाग ह्मणण्यापेक्षां रेसिटेशन ह्मणणेंच सयुक्तिक होईल. कारण, विद्यार्थ्यांनीं तोंडाला रंग न लावितां किंवा वेष न बदलतां टोप्या व गाऊन (झगे) घालूनच आपापलीं भाषणें तोंडानें ह्मटलीं होतीं. हींच भाषणें त्यांनीं पुन्हां एकदां खासगी रीतीनें एका वाड्यांत म्हणून दाखविलीं. यानंतर रा. बाबा गोखले यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीं 'मर्चट ऑफ् व्हेनिस' या शेक्सपीयरच्या नाटकाचा