पान:मराठी रंगभुमी.djvu/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८
मराठी रंगभूमि.

पडत नसे; व सकाळीं कंपनीचें अस्तित्व कायम आहे तर संध्याकाळीं तिचा मागमूसही राहत नसे!
 येथवर नाटकास मूळारंभ कसा झाला, पौराणिक नाटकांचे स्वरूप काय होतें, नाटकें होऊ लागल्यापासून पंचवीस तीस वर्षांत ज्या कंपन्या झाल्या त्यांची स्थिति कशी होती इत्यादि गोष्टी सांगितल्या. आतां पौराणिक नाटकें करण्याचे सोडून बुकिश नाटके करण्याकडे लोकांची कशी प्रवृत्ति झाली, बुकिश नाटकांचे स्वरूप काय, ती नाटके करण्यांत कोणकोणत्या कंपन्या पुढे आल्या, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील नाटकांचे प्रयोग कोणी कसे केले, वगैरेसंबंधाने दोन शब्द लिहितों.

बुकिश नाटकें अस्तित्वात आली त्या
वेळची परिस्थिति.

 विश्वविद्यालयाची स्थापना होऊन महाराष्ट्रांत इंग्रजी शिक्षण जारीने सुरू झाल्यावर त्या शिक्षणाचे जे कांहीं परिणाम झाले आहेत त्यांतच आमच्या लोकांची बकिश नाटकांकडील प्रवृत्ति हा एक परिणाम होय. कॉलेजमध्ये शेक्सपियरादि आंग्लकवींच्या व कालि- दासादि आमच्याकडील संस्कृत कवींच्या नाटकांतील रसास्वाद चाखण्याची संधि जेव्हां आमच्या लोकांस मिळं लागली, तेव्हां लोकांमध्ये 'नाटकग्रंथ, नाटकप्रयोग वगैरे विषयांसंबंधाची चर्चा सुरू होऊन आमच्यांतील विद्वान् लोकांचे लक्ष तिकडे लागले; व कॉलेजांतील