एखादा दागिना आणावयाचा. अशा रीतीने मिळविलेल्या
सामानावर एक दोन नाटकें होतात न होतात तोंच
पोटाची पंचाईत पडल्यामुळे व दुकानदाराचा उचापती-
बद्दल तगादा लागल्यामुळे नाटकवाले आपलें चंबूगवाळे
आटोपून दुसऱ्या खेड्यास कुच करीत! अशा प्रकारे
पैशाची प्राप्ति नाही, शिक्षणाचा अभाव, मंडळी छचोर *
आणि दुर्व्यसनी, असा नाटक कंपनीचा सर्व थाट जमल्या-
वर तेथे बोलाचालीस आणि लाथाळीस कधीच वाण
* नाटकी पोर किती छचोर असतें याचें रा. अनंत वामन
बरवे यांनी श्लोकरूपानें एके ठिकाणी वर्णन केलें आहे. तें मौजेचे
असल्यामुळे त्यांतील काही लोक येथे देती:-
दिसत पोर छिचोर कसे पहा ।
ह्मणति नाट्यकलेतचि दोष हा ॥
मुळिंच ढंग न हे परि नाटकी।
मन चटोर असे करि थाट कीं ॥ १॥
टिकलि बारिक रेखुनि लाविती ।
सहज टोपिहि वांकडि ठेविती ॥
करकरीत चढाउ चढीवती ।
छडि विडीहि गडी न विसंबती ।। २ ।।
सुबकसा पटका शिरिं बांधिती ।।
वर तुरा किति ऐटित खोंविती ॥
फिरविती सुरमा नयनांतही।
नटपणा मिरवीति जनांतही ॥ ३ ॥
भरजरी वर जाकिट घालुनी ।
झळक सांखळि लोबति ठेवुनी ॥
गळपटा लपटोनि गळा बसे ।
कथु कितीक तुह्मां नखरे असे ॥ ४ ॥