पान:मराठी रंगभुमी.djvu/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
मराठी रंगभूमि.

पाहिजे होता तो न राखतां चावटपणा व फाजिलपणा यांचा कळस केला; त्यामुळे फार्स ह्मणजे एक अचकट- विचकट तमाशा होऊन त्याने नाटकाच्या धंद्यास अगदी कमीपणा आणला.

वाईट नाटकमंडळ्यांची स्थिति,

 'चांगल्या मालास चांगली किंमत येते' अशी एक व्यापारी ह्मण आहे. या ह्मणीप्रमाणे त्या वेळी ज्या कांहीं चार दोन चांगल्या नाटकमंडळ्या होत्या त्यांनाच थोडेबहुत पैसे मिळत असत. वाकीच्यांची फारच वाईट स्थिति होती. या मंडळींना पैशाच्या अभावामुळे पोट- भर अन्न मिळण्याची सुद्धा मारामार पडू लागली. त्यांचा हा धंदा शहरांत चालेना ह्मणून पुढे त्या खेड्यापाड्यांतून हिंडू लागल्या, व खेळाचा दोन तीन रुपयांस कोणी मक्ता घेतला तर तो देऊन खेळ करूं लागल्या. या नाटकवाल्यांजवळ सोंगाला लागणारे कपडे किंवा दागदागिने मुळीच असावयाचे नाहीत. तेव्हां गांवांतील एखाद्या इसमाकडे जाऊन त्याला चार तिकिटें देऊन दोन लुगडी आणावयाची; दुस-या एखाद्या इसमाकडे जाऊन 'तुमच्या घरची माणसे फुकट सोडतों,' असे सांगून त्याचेजवळून एखादा जुना मंदील किंवा शालू आणावयाचा; तिसऱ्या एखाद्याकडे जाऊन असेल नसेल तेवढी भीड खर्च करून किंवा कोणा इसमास मध्यस्थ घालून एखादा साखळ्यांचा जोड किंवा असलाच दुसरा