पान:मराठी रंगभुमी.djvu/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३५
भाग १ ला.

लोक नव्हते असे आमचे म्हणणें नाहीं; होते, पण अशिक्षितांच्या जागी सुशिक्षित घालून नाटकांत सुधा- रणा न करतां पुनः आशिक्षितांच्याच हातांत तो धंदा गेला हे गैर झाले. असो; याप्रमाणे अक्षरशत्रु, अडाणी, छचोर, दुर्व्यसनी वगैरे लोकांची यांत खोगिर- भरती झाल्यामुळे नाटकाचा धंदा हलकट होऊन बसला, व नाटकवाले ह्मणजे कवडीमोल झाले.
 नाटकाच्या धंद्यास कमीपणा येण्यास या वेळी आणखी एक गोष्ट बरेच अंशी कारणीभूत झाली ती फार्स ही होय.* फार्स ह्मणजे मनोरंजनार्थ केलेली लहानशी नक्कल. ही नक्कल प्रयोगांती करण्याची वहि- वाट आहे, व तिची जरूरही आहे. कारण, नाटकाचा लांबच्या लांब एकच कथाभाग पाहून प्रेक्षकांच्या नेत्रांस आलेला थकवा या नकलेने नाहीसा होतो. पण ही नक्कल करतांना नाटकवाल्यांनी ठरलेल्या मर्यादेच्या बाहेर पाऊल टाकतां कामा नये, ही गोष्ट ध्यानांत धरली पाहिजे. त्यावेळी नाटकवाल्यांनी फार्स करीत असतां या मर्यादेचे उल्लंघन केलें. ह्मणजे फार्स करतांना त्यांनी एखाद्या व्यक्तीची अथवा प्रसंगाची जी हुबेहुब नक्कल करावयास पाहिजे होती व त्यांत जो नेमस्तपणा राखावयास


 * फार्स व प्रहसनें प्रथमतः अमरचंदवाडीकर यांनी रंगभूमीवर करण्यास सुरुवात केली, व तेथून पुढे इतर नाटकमंडल्या ती करूं लागली.