पान:मराठी रंगभुमी.djvu/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
मराठी रंगभूमि.

बाबाजी दातार व सोहनी यांची घेत. रा. नरहरबुवा यांनी नाटककंपनीवर पुष्कळ पैसे मिळविले; व मद्रास, तंजावर, काशी, वगैरे हिंदुस्थानांतील दूरदूरच्या प्रदे- शांत त्यांनी प्रवास केला. वरील तिन्ही चारी कंपन्यांत जे इसम होते ते बहुतेक भागीनेच होते; व दोन तीन वर्षांची सफर करून आले झणजे हिश्शेरसीप्रमाणे पैसा वाटून घेत असत. कोल्हापूरकर नरहरबुवा यांची कंपनी पंचवीस तीस वर्षे चांगल्या रीतीने चालली होती, व ती नुकतीच पांच सहा वर्षांखाली मोडली.
 वरील निरनिराळ्या कंपन्यांकडे किंचित् बारकाईने नजर फेंकली झणजे असे दिसून येईल की, त्या सर्वांचा उदय सांगली व त्याच्या आसपासच्या भागांत झाला. आणि याचे कारणही उघडच आहे की, मळ भावे यांची कंपनी सांगलीस निघाल्यामळे तिकडील लोकांना नाटकाची माहिती प्रथम झाली, व कांहीं फुटाफुटीने व कांहीं अनु- करणाने तिकडे नवीन कंपन्या अगोदर झाल्या; व ह्या कंपन्या जशा चोहोंकडे फिरू लागल्या तशी लोकांना नाट- काची गोडी लागून निरनिराळ्या ठिकाणी नव्या नव्या कंपन्या होऊ लागल्या; व आतांपर्यंत आस्तित्वांत आलेल्या व लयास गेलेल्या सगळ्या कंपन्यांची कोणी मोजदाद करूं लागेल तर त्याला त्या शंभराहूनही अधिक आढळून येतील असें आह्मांस वाटते. असो.