पान:मराठी रंगभुमी.djvu/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
भाग १ ला.

सांगलीकरांच्या कंपन्या पुढें चार झाल्या; व त्यांतील एक दोन कंपनींत भावे यांचे शिष्य व त्यांच्या शिष्यांचे शिष्य असे कांहीं इसम होते. त्यपैिकीं धोंडोपंत सांगलीकर यांची कंपनी बरी होती. आळतेकर मंडळींत आळत्यांतील व त्याच्या आसपासच्या खेडयांतील कांहीं मंडळी होती. इचलकरंजीकर कंपनीचे मूळ उत्पादक रा. चिमणभट व नारायणभट असे दोघे भाऊ भाऊ असून पुढें तिचें चालकत्व रा. अंताजीपंत ताह्मणकर व बाळंभट यांजकडे गेलें. या कंपनींत विष्णु वाटवे या नांवाचा इसम स्त्रीवेष उत्तम करीत असून बहिरंभट नांवाचाइड्सम राक्षसाचें काम चांगलें करीत असे;व आरंभीं सूत्रधाराचें काम बाळंभट हे करीत असून नंतर तें रा. राघोपंत आपटे या नांवाचे इसम करू लागले. पुढें पुढे शिवरामबुवा, रामभाऊ भिडे, वगैरे पात्रंही त्यांना येऊन मिळालीं; व शिवरामबुवा सूत्रधाराचें काम करू लागले; व भिडे हे देवाची भूमिका करू लागले. कोल्हापुरांत अगदीं पहिली नाटकमंडळी रा. नारायणराव कारखानिस यांनीं काढली. या मंडळींत गणु मेवकरी नांवाचा इसम उत्तम नाच करीत असे. याच कंपनोंत रा.नरहरबुवा सवाशे हे पूर्वी होते; व पुढें त्यांतून निघून त्यांनी ' चित्तचक्षु चमत्कारिक ” नांवाची स्वतंत्र नाटक मंडळी काढली. इचलकरंजीकर मंडळी कांहीं कविता रा. भावे यांची वापरीत व कांहीं तेथील शास्त्रीबुवा रा.