हे पान प्रमाणित केलेले आहे.
२७
भाग १ ला.
पौराणिक नाटकांसंबंधानें कांही गोष्टी.
या सर्व कंपन्यांची पौराणिक नाटकें*[१] करण्याची पद्धत एकच होती. ह्मणजे आरंभी गायनवादनयुक्त मंगलाचरण, नंतर गणपति-सरस्वतीचे आगमन, व नंतर कथाभाग. ही पद्धत रा. भावे यांनीच पहिल्याने घालून दिली, व तीच शेवटपर्यंत कायम होती. हल्ली नाटकांची छापिल पुस्तकें झाल्यामुळे पात्रांना भाषणे तयार करण्याची चांगली सोय झाली आहे. त्यावेळी ही सोय नसल्यामुळे नाटकाचे चालक कथाभागावरून भाषणे तयार करीत, व त्यांच्या नकला उतरून देऊन पात्रांकडून ती पाठ करवीत. कित्येक वेळी संथा दिल्याप्रमाणे पात्रांना पढवावें लागे. नाटकांतील बहुतेक पात्रं आशिक्षित असल्यामुळे त्यांना भाषणे पाठ करण्याचे जड जाई, व रंगभूमीवर धीटपणाने बोलण्याचे तर त्याहूनही जड जाई. तथापि, एकदां भाषणे पाठ झाली ह्मणजे तीं वज्रलेपाप्रमाणे होत. देवांची सोंगें करणारे कांहीं इसम व राक्षसांची सोंगे करणारे काही
- ↑ त्यावेळी जी पौराणिक नाटकें होत होती त्यांपैकी काहींची नावे येथे देतों: -सुभद्राहरण, वत्सलाहरण, सीताहरण, सीतास्वयंवर, कीचकवध, दुःशासनवध, वृत्रासुरवध, रावणवध, दक्षप्रजापतियज्ञ, कचदेवयानी, सुरतसुधन्वा, लहुअंकुश-आख्यान, बाणासुरवध, रासक्रीडा, नरनारायणचरित्र, नारदाची नारदी, कौरव- पांडवयुद्ध, किरातार्जुनयुद्ध, हरिश्चंद्र नाटक, इंद्रजितवध, श्रियाळचरित्र, वगैरे वगैरे.