फिरेना ! पुढे महाराजांनी तो हत्ती मंडळीला बक्षिस
दिला. तो स्वारीत काही दिवस होता; पण पुढे दररोज
५/७ रुपयांचा खर्च निभेना ह्मणून पंढरपुराहून हत्ती
परत अक्कलकोटास पाठविला.
याप्रमाणे रा. भावे यांच्या नाटककंपनीची हकीकत
आहे. नाटकाचा धंदा सोडल्यावर रा० भावे हे सांग-
लीसच राहिले, व तेथे आपल्या आवडीच्या कामामध्ये
नेहमी ते वेळ घालवीत असत. यांना ता० ९ आगस्ट
१९०१ रोजी त्यांच्या घरीच प्लेगनें देवाज्ञा झाली.*
* रा. भावे यांच्या चरित्रांतील काही मुख्य गोष्टी वर आल्याच
आहेत. तथापि, त्यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूर येथील विद्यावि-
लास ' वर्तमानपत्राच्या ता. २३ आगस्ट १९०१ च्या अंकांत में
अल्पचरित्र आले आहे त्यावरून त्यांच्या संबंधाची आणखी थोडी
माहिती येथे देतो.
" विष्णुपंतदादा यांचे वाडवडील वाईकडील राहणारे खरे; पण
बापू गोखल्याकडून सांगलीकरांनी त्यांना आपल्याकडे घेतल्याने
ते त्यांच्या पदरी तैनात घेऊन होते. यांचे वडील रा. अमृत
विठ्ठल हे कै. श्री. चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर यांच्या
पदरी लष्करावर अधिकारी होते. श्री. आप्पासाहेब यांणी अमृत-
राव यांना बेळगांवात मुद्दाम पाठवून त्यांजकडून इंग्रेजी कवाय-
तीचा अभ्यास करविला, आणि त्याप्रमाणे उर्दू भाषेत सांकेतिक
वाक्ये तयार करवून त्या खुणेप्रमाणे आपल्या सेनेतील शिपायांना
कवायत शिकविली. यांचे शूरत्व आमचे प्रांतांतील सामानगडाशी
लढाई झाली त्या वेळी इंग्लिश सरदारांनीही वर्णिलेलें आहे. तात्पर्य,
भावे यांचे वडील ज्याप्रमाणे तरतरीत होते त्याप्रमाणेच विष्णूपंत-