पान:मराठी रंगभुमी.djvu/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
भाग १ ला.
पौराणिक नाटकें करणान्या इतर कंपन्या.

 रा. भावे यांच्या नाटककंपनीची हकीकत वर दिली आहे. त्यांच्या पाठीमागून पौराणिक नाटके करणान्या


(मागील पृष्ठावरून चालू.)

दादा हेही तरतरीत होते. त्यांनी १०।१२ वर्षांचे वय असतां- नाच सांगली शहरचा देखावा ह्मणजे बाजार, स्वारी, वाडे इत्यादि प्रतिमारूपाने तयार केले होते. ती वाती श्रीमंतांच्या कानीं जा- ऊन त्यांनी ते समक्ष पाहून खुष होऊन त्यांना जवळ बाळगिलें. विष्णूपंतदादांना कोणीही गुणी मनुष्य आला तर त्याजजवळील गुण घेण्याचा छंद असे, त्याप्रमाणेच हे सखारामबोवा काशीकर ह्मणून तेथें गवई होते त्यांजजवळ थोडे गाणेही शिकले होते. त्यांनी प्रथम नाटक केले त्यावेळी त्यांचे वय १८।१९ वर्षांचे होते. त्या- वेळी कवितेखेरीज महाराष्ट्रभाषेत गद्यग्रंथ मुळीच नव्हते, मग बालबोध शुद्ध लिहिण्याचें नांव कशाला पाहिजे ? ह्मणून त्यावेळी त्यांनी पात्रांची भाषणे गद्यरूपाने तयार केली, आणि त्याला अनुसरून व पुढील भाग सुचविणाऱ्या अशा कविता तहत-हेच्या चालीवर केल्या. तमाशे, लळीत, इत्यादि जसे एखाद्या मनुष्याने करावे आणि इतरांनी तेथे पहायाला जावें, त्याप्रमाणे त्यावेळी नाटके रस्त्यावरही होत असत. अशा वेळी नाटक समाप्तीला आरती करीत, तेव्हां त्या आरतीच्या ताटांत शेंकडों रुपये जमत. यांनी जी पौराणिक ऐतिहासिक आख्याने लिहिली त्यांत हरिश्चंद्र, रास इत्यादि आख्याने फार प्रेमळ आहेत. नाटक कंपनी मोडल्या- वर यांनी कळसूत्री बाहुल्यांचा नाटकाप्रमाणे खेळ तयार केला. यांनी लांकडी पण मुबक चित्रं सुंदर वेषासह स्वतः हातार्ने तयार केली. या चित्राकरवी ते रासांत गोफ विणणे, अभिनया- सहित नृत्य करणे, पैलवानाकडून जोडीच्या त-हेत-हेच्या फेंका

करविणे इत्यादि बिकट कामेही करवीत. मात्र चित्रांची सूत्रे

(पृष्ठ २४ पहा.)