पान:मराठी रंगभुमी.djvu/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१
भाग १ ला.

लेला मुलगा आहे, हे लोकांना ओळखत नसे. एकदा पुण्यास असतां दिवसा स्त्रीवेष घेऊन याने पंक्तीस वाढले असतां कोणास ओळखलें नाहीं अशी आख्या- यिका सांगतात. बापू ताके* हे गृहस्थ यांच्या नाटकांत राक्षसाचें काम फार सुरेख करीत. हे आंगाने धिप्पाड असून यांचा चेहरा मोठा भव्य होता. यांच्यासंबंधानें अशी आख्यायिका आहे की, एकदां भावे हे कंपनी घेऊन अक्कलकोट संस्थानांत गेले होते. त्यावेळी तेथे एक हत्ती फार मस्तीस आला होता. तो कोणालाही जवळ येऊ देत नसे. त्याला जो कोणी मागे फिरवील त्यास मी तो बक्षिस देईन असें अक्कलकोटच्या महा- राजांनी सांगितले. ही गोष्ट भावे यांच्या मंडळींच्या कानावर आल्यावर ताके वगैरे इसमांनी आपण त्यास मागे हटवं असें सांगितले. नंतर महाराजांनी ही मंडळी उतरली होती तेथे हत्ती पाठविला. हत्ती येतांच राक्ष- सांची सोंगे घेऊन व हातांत तरवारी फिरवीत व राळ उडवीत ताके वगैरे मंडळी आरडाओरड करीत त्याच्या पाठीस लागली. हा भयंकर देवावा पाहून हत्ती घाबरून जो पळत सुटला तो काही केल्या माघारा


 *सदर गृहस्थांचें ताके हैं मूळ आडनांव नसून श्री. चिंतामण- राव आप्पासाहेबांच्या वेळी वाड्यांत ६।७ रुपये पगारावर दही- ताकावर देखरेख करण्याकरितां यांची नेमणूक झाली होती. ह्या- णून यांस ताके असें ह्मणत असत. तेंच नांव यांस पुढे पडले.