पान:मराठी रंगभुमी.djvu/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०
मराठी रंगभूमि.

जाल तर तेथें तुझांस पैसा व कीर्ति चांगली मिळेल असें सांगितलें; व 'ओळखीकरतां पाहिजे तर मी पत्रे देईन' असेंही त्यांनी आश्वासन दिले. पण धर्माचे उल्लंघन होईल ह्मणून भावे यांनी ती गोष्ट कबूल केली नाही.
 याप्रमाणे भावे यांनी चार सफरी करून इ.स. १८६१ पर्यंत नाटकाचा धंदा केला. त्यांत त्यांस किफायत विशेष झाली नाहीं; परंतु चार लोकांच्या ओळखी हो- ऊन स्नेह जमला. रंगभूमीवर नाटके करण्याची ही नवीच टूम यांनी अस्तित्वात आणल्यामुळे महाराष्ट्रांतील सर्व लोकांचे लक्ष तिकडे लागले, व त्यांचे अनुकरण करून मागाहून कित्येकांनी तशा नाटक मंडळ्याही काढल्या. भावे यांचे नाटक पहिलेच असून त्यांत सुधारणा वगैरे विशेष नव्हत्या, तरी त्यांचा एकंदर संच चांगला असून त्यांस मिळालेलीं कांहीं पात्रं नांवाजण्यासारखी होती. यांच्या नाटकांत गोपाळराव मनोळीकर ह्मणून एक गृहस्थ होते. हे आरंभापासून अखेरपर्यंत यांच्या स्वारीत असून सूत्रधाराचें काम फार सुरेख करीत. यांचा आवाज चांगला असून हे आपल्या गाण्याने लोकांवर चांगली छाप पाडीत. रघुपति फडके या नांवाचा स्त्रीवेष घेणारा एक मुलगा त्यांच्या कंपनीत होता. हा रूपाने फार चांगला असून याच्या आंगीं जात्याच अभिनयशक्ति चांगली होती. याने स्त्रीवेष घेतला ह्मणजे ही खरोखर स्त्री आहे की स्त्रीवेष घेत-