Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९८
मराठी रंगभूमि.


कंपनींतील इसमांचें खासगी वर्तन कोणास ठाऊक नसतें व त्यांची आणि प्रेक्षकांची कधीं ओळख नसते, त्यामुळे त्यांच्या वर्तनाचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम प्रयोगाचे वेळीं प्रेक्षकांवर थोडाच होणार आहे ' असें केणी कोणी ह्मणत असतात. पण या ह्मणण्यांत अर्थ नाहीं. नाटकांत मुख्य मुख्य भूमिका घेऊन पुढे आल्याच्या योगानें अगर अन्य कांहीं कारणानें ठाऊक झाल्यामुळें नटांसंबंधानें लोक नेहमीं चर्चा करीत असतात. अर्थात् त्यांच्याविषयीं बारिकसारिक गोष्टी त्यांना कळल्या असल्यामुळे त्याचा थोडाबहुत तरी परिणाम प्रेक्षकांच्या मनावर झाल्याशिवाय राहत नाहीं; निदान अशा वेळीं अशुद्धाचरणी नटानें शुद्धाचरणी, भक्तिमान, व उदारधी व्यक्तीची भूमिका घेतली असल्यास त्या भूमिकेशीं त्यांची जी तादात्म्यवृत्ती व्हावयास पाहिजे ती होण्यास बरे कष्ट पडतात. अशा प्रकारचा परिणाम प्रेक्षकांवर होऊं नये व प्रेक्षकांची त्यांच्याबद्दल अपूज्यवुद्धि होऊँ नये ह्मणून नाटकवाल्यांनीं आपल्या खासगी वर्तनाविषयीं अवश्य जपलें पाहिजे. अलीकडे खासगी सर्टिफ़िकिटा गोळा करून किंवा कायद्याचे शिक्केमोर्तब मारून आचरणशुद्धतेची खात्री करण्याचा एक नवीन प्रघात 'ड' चालला आहे; पण हा निवळ बाह्य प्रकार असून नीतिनिकषाच्या कसास तो कधींही उतरणार नाहीं. आचरणशुद्धतेची गोष्ट मनोमय साक्षीची आहे, व ती