पान:मराठी रंगभुमी.djvu/233

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९९
भाग ३ रा.


जोपर्यंत पटणार नाही तोंपर्यंत व्यवहारांतील इतर गोष्टींप्रमाणेंच नाटकमंडळीच्या कृतीविषयींही आदर उत्पन्न होणार नाहीं.
 याखेरीज नाटकांतील इसमांनीं गांवांतून न भटकणें, सभ्यपणा आंगीं ठेवणें, आपल्या धर्माप्रमाणें वागणें वगैरे गोष्टी पाळण्याविषयींही होतां होईल तितकी खबरदारी घ्यावी; ह्यणजे प्रयोगाची छाप पडून लोकांचे ठायीं त्यांच्याबद्दल सहानुभूति राहील.
 वरील सूचना सामान्यत्वें बुकिश व संगीत अशा दोन्ही तऱ्हेंच्या कंपन्यांस लागू पडणा-या आहेत. आतां संगीत कंपनीस लागू पडण्यासारख्या कांहीं सूचना येथें देतों.

संगीत नाटकांसंबंधानें विशेष सूचना.

 (१) संगीत नाटकाचा उद्देश मनोरंजन हा आहे. करितां तों साधण्यास मुख्यत्वेंकरून नाटकमंडळीनें चांगलीं गाणारीं पात्रे मिळविलीं पाहिजेत. पुष्कळ नाटककंपन्यांत ही उणीव असल्यामुळे लोक टाळ्या वाजवून किंवा वेडावून नाटकवाल्यांची कशी टर उडवितात हें पुष्कळांनीं पाहलें असेल.
 (2) पार्शी चालींच्या पद्यांचा भरणा करून धागडधिंगा करण्यानें मनोरंजन ह संगीताची कलाही बुडते. करितां गुगबद्ध संगीताचाच प्रकार जास्त वाढवावा. पुष्कळांना असें वाटतें कीं, साधारण जनसमूहास रागबद्ध संगीत समजतें कोठें ? आणि