पान:मराठी रंगभुमी.djvu/202

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
मराठी रंगभूमि.


खरें चित्र प्रेक्षकांपुढे मांडण्याविषयीं व विशेषत: नाटकापासून लोकांनीं काय बोध घ्यावा हें समजून देण्याविषयीं नाटककर्त्यांनें विशेष खबरदारी घेतली पाहिजे. हें काम ग्रंथकर्त्यांचें आहे व नाट्यशास्त्राचा अभ्यास करूनच हे गुण त्यानें आपल्या आंगीं आणले पाहिजेत. त्यासंबंधानें विशेष विवेचन करण्याचें हें स्थल नव्हे. असो; प्रयोगाची छाप लोकांवर पडण्यास नाटकवाल्यांनीं काय काय केलें पाहिजे याचेंही थोडक्यांत येथें विवेचन करितों.
 (१) नाटक कंपनींत मुख्यत्वेंकरून सुशिक्षित पात्रें असलीं पाहिजेत. पुष्कळ कंपन्यांत अशिक्षित लोकच फार असल्यामुळे, त्यांतून कित्येकांना धड लिहितां वाचतांही येत नसल्यामुळे नाटकाचें मर्म त्यांना मुळींच कळत नाहीं. अर्थातू त्या त्या रसास अनुकूल अशा प्रकारचा अभिनय किंवा भाषण त्यांच्या हातून होत नाहीं. एवढेंच नव्हे तर, वाक्यांत भलत्याच ठिकाणच्या शब्दावर जोर देऊन किंवा भलताच अभिनय करून विरस उत्पन्न करितात. आजपर्यंतच्या नाटकमंडळींकडे पाहलें तर सुशिक्षित पात्रं असणारी एकही कंपनी होऊन गेली नाही. फार कशाला? ज्या शाहुनगरवासी मंडळीचा बुकिश नाटकें करण्याबद्दल आज एवढा लौकिक झाला आहे त्यांतील मुख्य मुख्य पात्रांकडे पाहलें तर तीं सुद्धां बेताबाताचींच शिकलेली आहेत असें