दिसून येईल. इंग्लंड, फ्रान्स अमेरिका यांसारख्या सुधारलेल्या राष्ट्रांतील नाटककंपन्यांची स्थिति पाहिली तर आजमितीस त्यांत किती तरी शिकलेले लोक सांपडतील; एवढेच नव्हे तर, कित्येक नाटक कंपन्यांचे मालक व चालक ग्रंथकर्ते असून उत्तम नटही आहेत; व असें आहे ह्मणूनच तिकडे नाट्यकलेस मान आहे व त्या कलेवर नाटककांपन्या लाखों रुपये मिळवितात. आमच्या इकडे नाटकाचें मर्म समजणारीं पात्रें मिळण्याचें मुश्किल पडतें, मग कंपनीकरतां स्वत:च नाटक रचणारीं पात्रें मिळणें तर त्याहून कठिण आहे! असो; सांगण्याचें कारण इतकेंच कीं, नाटकाचा धंदा हा सुशक्षित लोकांचा धंदा आहे; सबब त्यांत सुशिक्षितांचा समावेश होईल तरच मराठी रंगभूमीचें पाऊल सुधारणेच्या कामांत दिवसेंदिवस पुढें पडत जाईल हें नाटक कंपन्यांनी लक्षांत ठेवावें
(२) नाटकांतील पात्रांनीं अभिनय कसा करवा हें शिकलें पाहिजे. तसेंच दुःखाच्या वेळीं कशी मुद्रा करावयाची, आनंदाचे वेळीं कशी करावयाची, रागाचे वेळीं कशी करावयाची, चिंता उत्पन्न झाली म्हणजे कशी करावयाची, आश्चर्य दाखवावयाच्या वेळीं कशी करावयाची, हेंही शिकलें पाहिजे. याखेरीज तोतरें बोलणारा, आंधळा, पांगळा, बहिरा, दारूबाज, इत्यादिकांचे अभिनयही त्यास करतां आले पाहिजेत. हे अभिनय अभ्यासाशिवाय
पान:मराठी रंगभुमी.djvu/203
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८५
भाग ३ रा.