पान:मराठी रंगभुमी.djvu/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८१
भाग ३ रा.


नाट्यकलेची आस्ते आस्ते सुधारणा
झाली पाहिजे.

 अलीकडे संगीत नाटकांचा विशेष प्रघात पडला आहे; व हल्लीं जीं नाटकें होतात तीं सरस नसल्यामुळे व गाणारीं पात्रेंही कमी दुर्जाचीं असल्यामुळें लोकाभिरुचीस एक प्रकारचें अपायकारक वळण लागत चाललें आहे. कै० आण्णा किर्लोस्कर, रा० डोंगरे किंवा यवतेश्वरकर यांच्या कंपनीची गोष्ट फारनिराळी होती. त्यांत गाण्याचा अभ्यास केलेलीं पात्रे होतीं व प्रयोगही भारदुप्त होत असत. हलीं पाटणकरी वळणावर सर्व नाटकें होऊं लागल्यामुळे नाटकांचा भारद्स्तपणा नाहींसा होऊन संगीतही हलक्या प्रतीचें झालें आहे. तसेच पूर्वीच्या रागबद्ध पद्यांच्या चाली जाऊन त्या ठिकाणीं पार्शीं चालींची पद्ये आली; एवढेच नव्हे तर, संगीत सौभद्रासारखीं जुनी नाटकेंच्या नाटकें सबंध पार्शींचालीवर होऊं लागलीं आहेत ! आमच्या मतें संगीत नाटकाच्या -हासाचीं हीं लक्षणें आहेत, व तीं ताबडतोब बंद केली नाहीत तर लवकरच संगीत कलेचा अस्त होईल असें आम्हांस वाटतें.
 आमच्या इकडे मराठी रंगभूमीवर नाटकें करावयास लागून फार दिवस झाले नाहीत; व आरंभीं पौराणिक, नंतर बुकिश व नंतर संगीत असे नाटकाचे प्रकार एका मागून एक इतक्या झपाट्यानें अस्तित्वांत आले की,