पान:मराठी रंगभुमी.djvu/198

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
मराठी रंगभूमि.


संबंध असणा-या इतर व्यक्तींचें वर्तन ठेवून प्रसंगही तसेच घातले पाहिजेत. याखेरीज कालस्थलांचीही एकवाक्यता ठेवली पाहिजे. अलीकडे कित्येक नाटककार आपल्याला आवडतील तसे किंवा कंपनीस उपयोगी पडतील तस फेरफार या गोष्टींत करीत असतात. पण त्यानें ऐतिहासिक व्यक्तींबद्दलचें खरें ज्ञान प्रेक्षकांना न होतां लोकशिक्षणाची दिशा चुकवून त्यांना आडमार्गांत नेऊन टाकल्याचा दोष त्यांच्या पदरी येतो. करितां ग्रंथकार व नाटकमंडळ्या या दोघांनीही याबद्दल सावध असावें. असो; हल्लीं मराठयांच्या इतिहासाचीं साधनें जास्त उपलब्ध झालीं असून अनेक ऐतिहासिक कागदपत्रही पुढे येत आहेत. अशा वेळीं पूर्वीच्या नाटकांत दुरुस्ती करून त्यांचे प्रयोग रंगभूमीवर आल्यास चांगलें होईल. ऐतिहासिक नाटकें चांगल्या रीतीनें पुढे येण्यास त्या नाटकांस कोणत्या तरी रीतीनें उत्तेजन मिळालें पाहिजे व हें उत्तजन वर सांगितल्याप्रमाणें कॉलेजांकडून जसें देता सार्वजनिक कामास जशी मदत करूं लागली आहे तशीच अशा प्रकारचे ग्रंथ तयार करण्याचे कामीं करूं लागेल तर त्यांत त्यांचें स्वतःचें व त्याबरोबरच राष्ट्राचेंही कल्याण आहे.