पान:मराठी रंगभुमी.djvu/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६५
भाग २ रा.


यांतील संविधानक भानगडीचें असून पद्येंही पूर्वीच्या दोन नाटकांतील पद्यांइतकींचा दुर्बोध झालीं आहेत. मूकनायकाप्रमाणेंच यांतही क्रित्येक सामाजिक विषयांचा समावेश झाला असून, विद्या श्रेष्ठ कीं वैभव श्रेष्ठ, स्त्रियांना शिक्षण देण्यापासून काय फायदे होतात इत्यादि गोष्टी दाखविल्या आहेत; व पढत मूर्ख, वेडसर, ख-या- खोट्या थापा देणारा अशीं पात्रें घालून त्यांत विनोद व हास्यरस खुलाविला आहे. संगीत नाटकास हास्यरस प्रतिबद्धक नसल्यामुळे सदर नाटकानें प्रेक्षकांचें चांगले मनोरंजन होतें. या नाटकांत कोणत्याही पात्राचें संगीताचें काम वाखाणण्यासारखे होत नसून संगीतापेक्षां भाषणें व अभिनय हींच बरीं होतात. भूमिका घेणा-या इसमांपैकीं रा. बोडस हे या नाटकांत शृंगीचें काम करीत असून चेह-यावर मनोविकार व्यक्त करण्याचें कौशल्य यांच्या अंगीं अप्रतीम आहे. अशा प्रकारचें एकच पात्र यांच्या कंपनींत आहे ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हें नाटक प्रहसनवजा असून दोन तीन तास सगळ्यांची करमणूक करणारें असल्यामुळे अलीकडे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं कंपनी गेली कीं, ती बहुधा याच नाटकाच्या नमनानें प्रयोगास सुरवात करते.
 या मंडळीनें यंदां नुकतेंच रा. पु. भा. डोंगरेकृत ' चंद्रहास ' नांवाचें एक नवें नाटक बसविलें आहे. चंद्रहासाला 'तूं राजा होशील' ह्मणून ब्राह्मणांनीं दिलेला