पान:मराठी रंगभुमी.djvu/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६४
मराठी रंगभूमि.

 बरीं होतात. रा. कोल्हटकर यांनीं या नाटकांत चांगला विनोद घालून बहिरा, मुका, जगद्वेष्टा, दारूबाज, ढेरपोट्या इ. प्रकारच्या पात्रांनीं हास्यरस खुलविला आहे; व सगीत नाटकांत अशा प्रकारची सुधारणा ही पहिलीच आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. यांतलि बरींच पदयें नव्या चालीवरचीं असून पूर्वीचीं कांहीं पात्रें तीं जुन्या त-हेवर म्हणण्याचा प्रयत्न करितात. पण एकंदरीत नाटकाचा प्रयोग गंगाजमनीच होत असलेला दृष्टीस पडतो. यांतील नांदीही ठरीव सांच्यांतली नसून रोहिणी, सरोजिनी, कुमार इ. पात्रे झोंपाळ्यावर बसून ईशस्तवनपर गाणें म्हणतात असें दुाखविलें आहे. या देखाव्यानें संगीत नाटक पाहुणा-याला आरंभीं गाणें ऐकण्याची जी सवय लागली आहे तींत बिघड न होतां रुचींत वैचित्र्य उत्पन्न होऊन मनाला संतोषही होतो.
 असो; यानंतर किर्लोस्कर मंडळीनें जें नाटक बसविलें तें ' गुप्तमंजूष ' हें होय, हें नाटक रा. कोल्हटकर यांनींच लिहिलें असून वरील दोन्ही नाटकांपेक्षां तें कमी दर्जाचें आहे. कालगंतीनें व अनुभवानें दिवसेंदिवस नाटक रचण्याचे कामीं सुधारणा व्हावयाची राहून रा. कोल्हटकरांच्या हातून वरील तीन नाटकें एकापेक्षां एक नीरस निपजार्वांत हें आश्र्वर्य आहे! नाटकाचा हेतु, संविधानक, पात्रांचे स्वभाव या दृष्टीनें पाहलें ह्मणजे 'गुप्तमंजूष' वास नाटक म्हणण्यापेक्षां प्रहसन म्हणणेंच होईल.