पान:मराठी रंगभुमी.djvu/184

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
मराठी रंगभूमि.


आशिर्वाद दुष्टबुद्धीस सहन न होऊन त्यानें कपटानें चंद्रहासाला मारेक-यांकडून ठार करण्याचा घाट घातला, पण ईशकृपेनें तो सिद्धीस न जातां चंद्रहास जिवंत राहिला या सर्वविश्रुत पौराणिक कथेवर या नाटकाचें संविधानक रचलें आहे. यांत मुख्य रस करुण हा आहे: पण तो साधावा तितका साधला नाहीं असें आमचें मत आहे. दुष्टबुद्धीचें कपट व नीच कृति हीं या नाटकांत दाखविलीं आहेत याहीपेक्षां अधिक दाखवावयास पाहिजे होती; व भाषणें आणि पद्येही त्या रसास अधिक अनुकूल अशीं घालावयास पाहिजे होती. तसेंच चंद्रहासाची ईश्वरावरील भक्ति, प्रेमळ स्वभाव व क्षमाशील वर्तन यांस अनुरूप असे अनेक प्रसंग या नाटकांत यावयास पाहिजे होते. चंद्रहास व दुष्टबुद्धि हीं दीन अगदीं भिन्न स्वभावाचीं पात्रें असल्यामुळे व त्यांच्या भिन्न कृतीवरूनच नाटकांतील मुख्य रसाची उत्पति होत असल्यामुळे त्यांचे स्वभाव यथायोग्य बनविण्याकडे जितकी काळजी घ्यावयास पाहिज तितकी ग्रंथकर्त्यांनें घेतल्याचें आह्मांस दिसून येत नाहीं. यांतील 'येनकेन प्रकारण' असल्या कांहीं पद्यांखेरीज बाकीची पद्ये बरीं असून त्यांत नव्या व जुन्या चालींचा संयोग केला आहे. तथापि, प्रसाद ह्यणून जो गुण आहे तो या नाटकांतील पद्यांत विशेष रीतीनें दिसून येत नाहीं. यांत संगीत संवाद फारसे नाहीत, तरी संगीत मत्राक्षता व ' अजब चीज है पैका ' अशासारखीं खालच्या