प्रयोग नुकतेच केले. पैकीं ' कर्कशादमन ' हें शेक्सपियरच्या ‘ टेमिंग ऑफू धी श्रयू ' च्या आधारें रचिलें असून प्रो. केळकर यांनीं रचलेल्या ' त्राटिका ' नांवाच्या गद्य नाटकांत जो विनोद व जो हास्यरस उतरला आहे त्याचा शतांशही वांत उतरला नाहीं. लोकांना दररोज नवीं नवीं नाटकें लागू लागलीं आहेत म्हणूनच रा० पाटणकर यांनीं आपली टांकसाळ इतक्या जारीनें सुरू ठेविली आहे कीं काय न कळे ! बाकी या टांकसाळींत पाडलेलीं नाटकें किती सरस असतात हें वाचकांच्या अनुभवास आलेलेंच असेल. असो; दुसरें नाटक ‘प्रेमदर्शन' हें सद्यःस्थितिदर्शक असून त्यांत " दुष्काळाचे कामावर नेमलेले आधिकारी मदांध हेऊन अधिकाराच्या जोरावर कनक व कांता यांचा अभिलाष धरून कशीं अनुचित कृत्यें करण्याला प्रवृत्त होतात व त्यापासून गोरगरिबांना कशीं संकटें भोगावीं लागतात, याचें चित्र काढलें आहे. दुष्काळाच्या कामावरील लोकांसाठीं काढलेल्या इस्पितळाचा एक प्रवेश यांत घातला आहे व त्यांत इस्पितळावरचा डाक्टर उदार मनाचा असल्यामुळे रोगी लोकना फार सुख झालें, असें दाखविलें आहे. तसंच दुष्काळाच्या कामावर ज्यांनीं पैसे खाऊन भलभलतीं कृत्यें केलीं होतीं त्यांना योग्य शासन करून बंदिवास भोगावयास लाविला आहे. " बाकी या दोन्ही नाटकांतील पदयें त्यांच्या पूर्वीच्या नाटकांतील पद्यांप्रमाणेंच
पान:मराठी रंगभुमी.djvu/177
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५९
भाग २ रा.
