Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६०
मराठी रंगभूमि.


नव्या त-हेचीं व नीरस असून ' प्रेमदर्शनां 'तील प्रेमाचा मासला कांहीं विचित्रच आहे !
 " माणिकप्रभुप्रासादिक " कंपनीनें नुकतेंच ‘ सगीत रुढिविनाशन ” नांवाचें एक नाटक बसविलें आहे. हें नाटक सामाजिक विषयांवरील असून त्यांतही शारदेप्रमाणेंच अठराधान्यांचें कडबोळें बनविलें आहे. यांत बालविवाह, जरठोद्वाह, विधवाविवाह, केशवपन, वैगरे अनेक सामाजिक विषय आले असून शिवाय तरुण मंडळीच्या अकालिक मृत्यूचीं कारणें, नणदाभावजयांचें हाडवैर, चहाच्या व्यसनाचे अनिष्ट परिणाम, गुणकारी वनस्पतींचें ज्ञान गुप्त ठेवण्यापासून तोटे, फौजदारी कायद्याचें रहस्य, इ० गोष्टींचाही यांत समावेश केला आहे. नाटकांतील पद्ये रा० शंकर मोरो रानडे यांनीं तयार करून दिलीं आहेत; पण तीं सरस झालीं नाहींत. तसेंच यांतील पद्ये नव्या चालीवरचीं असून एकंदर प्रयोग पाटणकरी साचांतलाच होतो.

अलीकडची किलोंस्कर मंडळी.

 आतां किर्लोस्कर मंडळीच्या हल्लींच्या स्थितीची थोडी माहिती देऊं. रा. भाऊराव कोल्हटकर यांच्या मृत्यूनंतर ही कंपनी पुन्हां आपलें डोकें वर काढील, अशी आशा नव्हती. कारण, भाऊरावांची जागा भरूनाः काढणारें पात्र मिळण्याची मुश्किल होती. अशा स्थितींतही कंपनीच्या इतर चालकांनीं आपला दम खचूं न