Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५८
मराठी रंगभूमि.


' माणिकप्रभुप्रासादिक ' कंपनीनें रा. अ. वा. बरवेकृत 'लोकमतविजय ' नांवाचें एक नवें संगीत नाटक केलें होतें. हें नाटक मुंबई इलाख्यांत सन १८९७ सालीं जें राजकीय वावटळ उठलें होतें व ज्यांत कुकल्पनेचें साम्राज्य होऊन “ चित्तक्षोभ, पक्षपात, कारस्थान, मतलब, दंड, अशा एकतंत्री मंडळींची बंडाळी माजून ” त्याचें प्रायश्चित्त विचारस्वातंत्र्य, मुद्रणकला, लोकमत वगेरेंस कसें भोगावें लागलें या स्थितीचें चित्र पुढे ठेवून त्या धतींवर हें नाटक रचलें आहे. संगीतांत अशा प्रकारचें नाटक हें पहिलेंच असून त्यांत " आधीं क्रिया मग विचार करुं तियेचा । शिक्षा अगोदर तपास पुढें गुन्ह्याचा ॥ पूर्वीच अमल बजावुनेि त्यास पाहूं । आधार नंतर असा अधिकार वाहूं ॥ ” इ. श्लोकृतूिन व पद्यांतून जे विचार गोंविले आहेत ते मार्मिक आहेत. तसेंच असंतोष, उन्माद, शांती, राजनिष्ठा, देशाभिमान, लोकमत, विचारस्वातंत्र्य, इ० पात्रांच्या तोंडीं रा० बरवे यांनीं जों भाषणें घातलीं आहेत तीं प्रेक्षकांच्या मनावर त्या त्या पात्राच्या स्वभावाचा ठसा चांगल्या रीतीनें उमटवितात. यांतील पद्यांच्या चाली पार्शीं व गुजराथी नाटकांतील पद्यांच्या चालींवर असून मधून मधून झगड्यांच्या धतींवर संगीत संवादही आहेत.
 रा.पाटणकर यांनीं 'प्रेमदर्शन' आणि ' कर्कशादमन ' अशीं दोन नवीं नाटकें संगीतांत रचून त्यांचे