पान:मराठी रंगभुमी.djvu/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग १ ला.

नेहमीं चाले. त्यातल्या त्यांत पुणें शहराजवळ चिंचवड गांवची मंडळी लळीत करी तें अंमळ बरें होई असें म्हणतात.
 तमाशे हे मुसलमानी अमदानींत सुरू झाले असून बादशाही वैभवाबरोबर जे कांहीं चैनीचे व करमणुकीचे प्रकार अस्तित्वांत आले त्यांत यांची गणना होते; व पुढें यांचेंच अनुकरण मराठी राज्यांत झालें. तमाशाचें सामान्य स्वरूप हणजे पाठीमागे डफतुणतुण्यावर गाणें, पुढे नाचापोराचा नाच, आणि मधून मधून सोंगाची बतावणी हें होय. लळीतापेक्षां यांत ग्राम्य प्रकार फार. यांत ज्या लावण्या ह्मणतात त्या बहुतेक शृंगारिक असून त्यांत बीभत्सपणाही पुष्कळ असतो. अशा प्रकारचे तमाशे शेवटच्या बाजीरावाच्या कारकीर्दीत विशेष प्रचारांत आले. रावबाजी हे स्वतः चैनी असल्यामुळें प्रजेंतही ऐषआरामी वाढून तमाशासारख्या करमणुकीस आधिक उत्तेजन मिळालें, व रामजोशासारखे ब्राह्मण गृहस्थही " कलगीतुऱ्याच्या नादांत असून लावण्याच्या छंदावर कवनें करून, स्वच्छंदानें डफ़तुणतुणें, सारंगी आणि नाचेपेोरे हातीं घेऊन चरितार्थ चालवू लागले. " त्या कालीं महाराष्ट्रांतील लोकांत चैनीचे प्रकार कसे वाढले होते, तमाशांकडे लोकांचें किती लक्ष लागलें होतें, व प्रख्यात तमासगीर कोण कोण होऊन गेले याचें वर्णन एका ग्रंथांत पुढीलप्रमाणें केलें आहे:-