पान:मराठी रंगभुमी.djvu/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४५
भाग २ रा.


मुळें ते आपल्या गायनानें लोकांस मोहित करींत असत. आतां त्यांनीं पाशीं चालीच्या पद्यांतील सुरांचा सर्वस्वी अंगिकार केला होता असें नाहीं; पण या नाटकांतील आपल्या कित्येक पद्यांतून ते थोडेबहुत तसले सूर काढूं लागले, व लोकाभिरुचींत फरक पडत चालल्यामुळे त्यांनाही ते फार आवडूं लागले. भुजंगनाथाची भूमिका रा. नारायणबुवा मिरजकर हे घेत असून आपल्या मधुर गाण्यानें ते लेोकांना चांगले रिझवूं लागलेच, पण याहीपेक्षां अभिनयाची छाप त्यांनीं जास्त पाडिली. आरंभीं ह्माताऱ्या सारखें कुबड काढून लोडाला टेकून बसणें, कृत्रिम दांतांची कवळी पडल्यावर तोंडाचें बोळकें झालें असें दाखविणें, केसांना कलप लावून व सजून नटून तारुण्याची उसनी ऐट दाखविणें वगैरे प्रकार हुबेहुब वठविण्याची त्यांची हातोटी फारच चांगली आहे. संगीत नाटकांत लहान मुलांचीं - विशेषतः गाणा-या लहान मूलांचीं - कामें अलीकडे बरीच होऊं लागलीं आहेत. पण सर्व कंपन्यांत तीं चांगलींच हातात असें नाहीं. या कंपनींत तीन चार मुलें चांगलीं व हुषार असून वल्लरीचें काम करणारा मुलगा तर " म्हातारा इतका न अवघें पाउणशें वयमान " हें पद्य म्हणतांना अभिनयाबद्दल सारख्या टाळ्यांवर टाळ्या घेतो. पार्शी नाटकांत एकदम सारख्या पोषाखाचीं दहावीस पात्रें रंगभूमीवर आणून त्यांच्याकडून नृत्य-