पान:मराठी रंगभुमी.djvu/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४
मराठी रंगभूमि.


प्रसादयुक्त पद्ये पुष्कळ आहेत. खेरीज कोदंडानें ' नका करूं अविचार ' या पद्यांत भुजंगनाथाला लग्न न करण्याविषयी केलेला उपदेश, 'श्रवानाहुन अतिनीच तुम्हीरे, स्वाथी मांजरसें टपतां, ” या पद्यांत भद्रेश्वर दीक्षित ' श्रीमंत पतीची राणी मग थाट कायतो पुसता, ' व तूं श्रीमंतीण खुरी शोभशिल, डौल किती येईल तुला, या पद्यांत शारदेचें भुजंगनाथाशीं लग्न झाल्यावर ती कशी वागल याचें विनोदानें केलेलें वर्णन, वल्लरीनें ‘ ह्मातारा इतका न अवघें पाऊणशें वयमान ' या पद्यांत थट्टनें भुजंगनाथाचें रेखटलेलें चित्र, कोदंडानें ‘ जो लोककल्याण । साधावया जाण । घेई करीं प्राण । त्या सौख्य कैचें ।। " या पद्यांत थोर पुरुषावर काय काय संकटें येतात याचें केलेलें विवेचन, व शारदनें ‘ यमपाश, गळयाशीं ज्यास लागला त्यास, मला कां देतां, ' ' तूं टाक चिरुनि ही मान, नको अवमान ' इ० पद्यांतून ह्माता-या नवऱ्याला न देण्याबद्दल फोडलेला हंबरडा हीं या नाटकांत फारच बहारीचीं असून त्यांतील उपमा, अलंकार हीं सर्वोत्कृष्ट साधलीं आहेत. असो; नाटकाच्या स्वरूपासंबंधानें जें कांहीं सांगावयाचें होतें तें येथवर सांगितलें. आतां या नाटकाच्या प्रयोगासंबंधानें शब्द लिहूं. किर्लोस्कर कंपनींत रा. भाऊराव कोल्हटकर हे कोदंडाचें काम करीत असल्या-