Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३२
मराठी रंगभूमि.


दारींतील गाण्याचा प्रघात बंद होऊन तानेच्या आरोहावरोहाचा तर अगदींच लोप झाला. कित्येक नाटकांत गाण्यापेक्षां शब्दांच्या ठेवणीवर व कांहीं शब्द झटपटीनें उच्चारण्यावरच विशेष लक्ष पुरावलें जातें. हें पाटणकरी अनुकरण अलीकडील पुष्कळ कवींनीं केलें असून तशाच तन्हेची संगीत नाटकें आज मराठी रंगभूमीवर पुष्कळ येत आहेत. प्रोढ व भारदस्त नाटकांच्या ठिकाणीं अशा प्रकारचीं नीरस नाटकें होऊं लागल्यामुळे व पूर्वीच्या रागबद्ध संगीतास रजा देऊन त्याच्या ठिकाणीं'हा मदंगा' सारखे झगडे व ' हाणहाण दाणादाण ' सारखी दंडली सुरू झाल्यामुळे व असल्याच नाटकांची लोकांस गोडी लागल्यामुळे संगीत नाटकाची कला लयास जात कीं काय अशी धास्ती पडली आहे.” असो; या पाटणकरी नाटकांचा दुष्परिणाम किर्लोस्करासारख्या चांगल्या कंपनीवरही थोडाबहुत झाला, व लोकाभिरुचि पाहून तिलाही त्या नाटकांचें अनुकरण करावें लागलें.


 * मुधारक पत्राच्या ता० १५ आगट १८९८ च्या अंकांत " कविता देवांची स्वातंत्र्यप्रांति " या मथळ्याखालीं एका विनोदी गृहस्थानें एक लेख लिहिला अढ़ेि. त्यात अलीकडील कविता किती नीरस असते व विशेषतः संगीत नाटकांत तिची किती दुर्दशा झाली आहे, याचें हुबेहुचू चित्र त्यार्ने काढिलें आहे तें आमच्या वाचकांस पाहण्यास मिळावें म्हणून मुद्दाम त्या लेखांतील मह्त्वाचा भाग जशाचा तसाच येथें दिला आहे:-
 " मंथरेचा स्पर्श होतांच ज्याप्रमाणें कैकेयीचें स्वरुप पालटलें,