पान:मराठी रंगभुमी.djvu/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३१
भाग २ रा.


आला. तिसरी गोष्ट-संगीत नाटकांत चांगलीं गाणारीं पात्रे लागतात. तीं नसल्यामुळे अध्ययनावांचून जें गाणें ह्मणतां येईल तशा प्रकारचें गाणें झालें, व खरी गायनकला ओहटीस लागून गाण्याचे चोचले व निवळ ढंग कायम राहिले. यांत आणखी ग्राम्यतेची भर पडल्यामुळे पाटणकरी नाटकें ह्मणजे निवळ तमाशे होऊन बसले; आणि खरोखर तमाशामध्यें जसे झगडे असतात तसे झगडे या नाटकांत असल्यामुळे या नाटकांस तभाशे तरी कां हागू नये ? असी; अशा प्रकारचीं कमी प्रतीचीं नाटकें रचून तीं रंगभूमीवर आणल्यामुळे गिरणींतील मजूर, कुणबी, माळी वगैरे अशिक्षित लोकांच्या रुचीस तीं लवकर पात्र झालीं व त्यांवर पैसाही चांगला मिळू लागल्यामुळे पाटणकरांची तशाच नाटकांवर प्रीति जडून त्यांनीं तसल्या नाटकांची एक गिरणीच सुरू केली; व आठ पंधरा दिवसांत नवीन नाटक रचून तें रंगभूमीवर आणण्याचा त्यांनीं क्रम आरंभिला.
 रा. पाटणकर यांनीं आपल्या नाटकांत पाशीं व गुजराथी चालीवरचीं पद्ये घातलीं आहेत; पण तीं इतकीं घातलीं आहेत कीं, त्यांनीं मूळच्या जुन्या पद्यांच्या चालींचा संहारच करून टाकला आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. पाशीं व गुजराथी चालीच्या पद्यांतील चढउतार सूर काढतांना कानाला गोड लागतात; पण लोकांची सगळी तिकडेच प्रवृत्ति झाल्यामुळे शुद्ध राग-