Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मराठी रंगभूमि.
भाग १ ला.

 विषयोपक्षेप ― मराठी रंगभूमीचा पाया ― नाटकें प्रथमतः कोणीं सुरू केलीं? ― पौराणिक नाटकांचा प्रारंभ ― भावे यांची नाटक मंडळी ― पौराणिक नाटकें करणाच्या इतर कंपन्या पौराणिक नाटकासंबंधाने काहीं गोष्टी ― नाटकाचा धंदा हलकट कां झाला? ― वाईट नाटकमंडळ्यांची स्थिति ― बुकेिश नाटकें अस्तित्वांत आलीं त्यावेळची परिस्थिति ― बुकेिश नाटकूांचा प्रारंभ ― आर्योद्धारक मंडळी ― पडदे, पोषाख, देखावे वगैरेंत सुधारणा ― राजाराम कॉलेजांतील नाटकॅ ― नरहरबुवांचें दुर्गा नाटक ― शाहूनगरवासी मंडळी ― ऐतिहासिक नाटकें ― सामाजिक विषयांवरील नाटकें.

विषयोपक्षेप.

 प्रस्तुत विषय महाराष्ट्रांतील लोकास मोठा उपयुक्त व मौजेचा असा आहे. कां कींं, एक तर गा विषयावर कोणी फारसें लिहिलं नसल्यामुळे त्यांस तो नवाच वाटणार आहे. दुसरें असें कीं, यांत मराठी रंगभूमीसंबंधानें आरंभापासून आतांपर्यंतची सर्व हकीकत येणार असून कांहीं नाटकमंडळ्या व खासगी मंडळ्या यांसंबंधानें विशेष हकीकत येणार असल्यामुळे यापासून ज्ञान व करमणूक या दोहोंचाही लाभ त्यांस मिळणार आहे. यास्तव त्यासंबंधानें आह्मांस जें लिहावयाचें आहे तें लिहितों.