रा. नारायणबुवा मिरजकर, गजानन बुवा, नथुबुवा गुरव अशीं तीनचार पात्रे चांगलीं होतीं. आण्णांच्या नाटकांत भाऊराव जसे मुख्य स्त्रीपार्ट करीत असत तसेंच डोंगरे यांच्या नाटकांत रा. गजाननबुवा हे करीत असत; व आरंभीं भाऊराव आणि गजाननबुवा यांची तुलना करूं लागले तेव्हां लोक ' गजाननबुवांचें काम कांकणभर चढच होतें ' असें म्हणत. गजाननबुवांच्या सर्व कामांत तिलोत्तमेचें काम उत्कृष्ट होत असे. हे शास्त्रीय पद्धतीनें गाणें शिकल्यामुळे व यांचा आवाजही कसला असल्यामुळे आपल्या मोहक गाण्यानें व अभिनयानें लोकांना ते तलीन करून सोडीत असत. 'इंद्र करी जरी प्रीति मजवरी ० ,' ' दु:खित तरुवर झाले० ' इ० यांच्या तोंडचीं पद्ये ज्यांनीं ऐकलीं असतील त्यांना आमच्या ह्मणण्याची खात्री तेव्हांच पटेल. असो; रा. नथुबुवा गुरव हे या नाटकांत इंद्राचें काम करीत असत. यांचा आवाज पहाडी असून तो फार चढत असे व मोरोबाप्रमाणेंच लावणीच्या चालीवरचीं कांहीं पद्ये हे उत्कृष्ट ह्मणत असत. नारायणबुवा तर बोलून चालून गवयीच. शिवाय आवाजी गोड असून रंगभूमीवर कशी बहार करावी हें त्यांना अवगत होतें. त्यामुळे चंद्रकांत, माधव, वगैरेंचीं कामें ते अप्रतीम करीत असत. डोंगरे स्वतः सर्व नाटकांत सूत्रधाराचें काम करीत असत; व हे देखणे आणि भव्य असल्यामुळे यांचें काम आण्णा-
पान:मराठी रंगभुमी.djvu/137
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११९
भाग २ रा.