पान:मराठी रंगभुमी.djvu/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
मराठी रंगभूमि.


कडे न लागतां संगीताकडे विशेष लागून मनोरंजन होई. आण्णापेक्षां डोंगरे यांनीं आरंभीं जी सुधारणा केली ती शाकुंतल नाटकांत शकुंतला व तिच्या दोन सख्या प्रियंवदा आणि अनसूया या तिन्ही पात्रांच्या तोंडीं पद्ये घातलीं. त्यामुळे लोकांना तीं आवडून डोंगरे यांच्या नाटकाकडे त्यांचा विशेष ओढा लागला; व पुढे आण्णांनीही ही लोकाभिरुचि पाहून आपल्या शाकुंतल नाटकांत सुधारणा करून शकुंतलेच्या तोंडीं उत्तम उत्तम पद्ये घातलीं. रा. डोंगरे यांचें विशेष लोकप्रिय झालेलें नाटक हाटलें ह्मणजे " संगीत ईद्रसभा " हें होय. या नाटकाचा प्रयोग संगीत शब्दाच्या मूळ व्याख्येप्रमाणें ह्यणजे नृत्ययुक्त गायन अशा प्रकारचा होत अस. कांहीं वर्षांपूर्वी मि. दादाभाई पटेल एम्. ए. यांनीं लखनौ येथील इंद्रसभेच्या आधारानें गजल, टुंब-या वगैरे घालून उर्दू भाषेत इंद्रसभा या नाटकाचा प्रयोग केला होता, तशाच धर्तीवर हा प्रयोग रा. डोंगरे यांनीं मराठींत केला. आण्णांच्या वरील तीन नाटकांत नृत्ययुक्त गायनाचा प्रकार नसल्यामुळे * डोंगरे यांच्या नाटकाकडे लोकांचा ओढा लागण्यास हें एक दुसरें कारण झालें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. यांच्या नाटकांत


 * सौभद्रनाटकांत रुक्मिणीच्या महालांत तिच्या करमणुकी करतां म्ह्णून पूर्वी नाच करीत असत. पण हा प्रकार थोडे दिवस चाळुन पुढें बंद पडला. हल्लींच्या मंडळीनें तो पुन्हां सुरू केला आहे.