Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११३
भाग २ रा.


रुचींत व परीक्षेत पुष्कळ सुधारणा झाली आहे. आण्णा स्वत:च्या प्रकृतीविषयी होता तितका उदासीन नसता तर बरेच दिवस वाचता व लोकांचें मनोरंजन व स्वतःचें हित करूं शकता. "*
 रा० आण्णा किर्लोस्कर यांच्या मृत्यूनंतर रा० मोरोबा, नाटेकर व भाऊराव या तिघांनीं पूर्वीप्रमाणेंच कंपनी चालविण्याचें ठरविलें; व पूर्वीच्या एकंदर व्यवस्थेंत आणि टापटिींत कांहीं फरक पडू दिला नाहीं. उलट कंपनी चालविण्याचें जेोखमीचें काम आपल्यावर येऊन पडलें आहे, असें वाटून हे तिघेही आपापल्या परीनें मेहनत करीत. तरी पण हे आतां स्वतः मुखत्यार झाल्यामुळे व आण्णासारखा कोणी यांना दाबणारा नसल्यामुळे केव्हाकेव्हां आपसांत कलह होऊन कंपनीच्या कामास व्यत्यय येई, व कांहीं दिवस रा० नीटेकर हे कंपनी सोडूनही गेले होते. तथापि, कंपनी नांवारूपास आलेली असून तीवर प्रत्येकास किफायतही चांगली होत असल्यामुळे हा आपसांतील कलह बाजूस ठेवून मंडळी काम करीत असे. आण्णा असतांना मंडळीनें ग्वाल्हेर, इंदूर, इकडे एकदां सफर केली होती; पण पुढें था मंडळीनें महाराष्ट्रांतील मुख्यमुख्य ठिकाणींच नव्हे तर मध्यप्रांत, कर्नाटक, उत्तर हिंदुस्थान


 * केसरी ता० १७ नोव्हेंबर १८८५.