Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११२
मराठी रंगभूमि.


व गोड असून कित्येक ठिकाणा तींत चांगली कल्पनाशक्तिही दिसून येई. संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र हीं फार लोकप्रिय झालीं आहेत. याचें रामराज्यवियोग नाटक अपुर्त राहिलें आहे. गेल्या पांचचार वर्षात याच्या मंडळीनें महाराष्ट्रीयांची उत्तम प्रकारची करमणूक करून पुष्कळपैसा मिळूविला. पैशाच्या संबंधानें आण्णाचा हात सढळ असल्यामुळे व स्वभाव मिठा असल्यामुळे पाहिजे तसलीं मनुष्यें वश करून वऊन आपल्या उपयोगास लावून घेण्याची हातोटी आण्णास फार चांगली साधली होती. आण्णाच्या नाटकांनीं संगीताचे आलाप पोरासोरांच्या तोंडीं बसून जाऊन लोकांच्या गायनसंबंधीं


(पृष्ठ १११ वरून समाप्त )

णीय होत असून एकदां डेक्कन कॉलेजमध्यें खेळ चालला असतां . किलहॉर्न साहेब है त्यांचें सोंग व अभिनय पाहून खुष झाले, व त्याबद्दल त्यांनीं त्यांची तारीफ केली. संस्कृत शाकुंतलू नाटकानें पाश्चात्य राष्ट्रांचें मन वेधल्यामुळे भाषांतर रुपार्ने का होईना, पण त्या नाटकाचे प्रयेाग तिकडील लोकांस पहावयास मिळून प्राचीन ऋषी, त्यांचे आचारविचार, रीतीभात व त्या वेळची समाजस्थिति र्हीं त्यांना पह्वावयास मिळेल म्हणून कंपनी घेऊन जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, वगैरे देशांत जाण्याविषयी कॉलेजांतील कित्येक ऑग्लगुरु व इतर साहेब लोक यांनीं आण्णांस प्रोत्साहन दिलें. पण अनेक अडचणींमुळे आण्णांच्या हातून ती गोष्ट झाली नाहीं. यांना मधुमेहाच्या विकारनें गुलेहोनुर येथें ता. २ नोडॅबर १८८५ रोजीं देवाज्ञा झाली. यांना मुलबाळ कांहीं नाहीं. यांच्या पश्चात यांचे कुटुंबास दरसाल कंपनीच्या उत्पन्नांतील कांहीं भाग पोंचत असतो.