यांतील लहान मोठया कित्येक शहरांत जाऊन तिनें प्रयोग केले. नाटेकरांच्या गैरहजेरीत रा. रामभाऊ किंजवडेकर हे केव्हांकेव्हां त्यांचीं कांहीं कामें करीत. यांचा आवाज गोड असून पद्ये म्हणण्याची यांची तन्हाही बरी असे.आण्णांच्या पाठीमागें कांहीं दिवस सूत्रधाराचें व दशरथाचें काम हेच करीत असत. हलीं हे याच कंपनीत आहेत; पण उतारवयामुळे त्यांच्या ह्यातून परं श्रम होत नाहींत. असो; आण्णांच्या पाठीमार्गे रा. नाटेकर, मोरोबा व भाऊराव या त्रयीच्या जिवावर सरासरी इ. स. १८९० पर्यत कंपनीचें काम पूर्वी इतकेंच जमानें चाललें होतें; व त्यांनीं पूर्वीच्या तीन नाटकांखेरीज 'विक्रमोर्वशीय' हेंही एक नवीन नाटक बसावलें होतें. पण पुढ़ें नाटकरांची प्रकृति अस्वस्थ हेऊन त्यांनीं कंपनी सोडल्यामुळे व उतारवय होऊन मोरोबांस पूर्वी इतकें काम करण्याची ताकद न राहिल्यामुळे कंपनीची जोखीम भाऊरावांवर पडली, व तींत पुष्कळ फेरफारही झाले. यावेळीं भाऊराव वयानें मोठे झाले असल्यामुळे त्यांना स्त्रींविषही शोभेनासा झाला होता. तरी पण नवीन पात्रे आणून कांहीं तरी व्यवस्था करीपर्यंत ते तसेच स्त्रीवेष घेऊन काम करीत असत. पुढे मोरोबांनीही कृाम करावयाचें सोडून दिलं. अर्थात् मुख्य पुरुषपार्टाचीही उणीव पडली. भाऊरावांच्या मनांत एकदां असेंही आलें कीं, दुसरा एखादा मुलगा तयार करून त्याला स्त्रीवेष द्यावा व आपण पुरुषपार्ट
पान:मराठी रंगभुमी.djvu/132
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४
मराठी रंगभूमि.