हरकत नाहीं. यांच्या मृत्यूसंबंधानें 'केसरीकारां नीं आपल्या पत्रांत जे उद्वार काढले आहेत, त्यांवरून त्यांचा स्वभाव व कृति लोकादरास किती पात्र झाली होती, याची उत्तम साक्ष आमच्या वाचकांस पटेल. ते म्हणतात:- “आण्णा किर्लोस्कर हा गृहस्थ मोठा मार्मिक व रासेक होता. गायनकलेर्चे यास चांगलें ज्ञान होतें. याची वृत्ति फार शांत व उदार असे. याची कविता सेपी
पोलिसखात्यांत काम केलें; व नंतर कमिशनरसाहेबांच्या ऑफिसांत त्यांना ५० रुपयांची जागा मिळाली. पुढें हें ऑफिस पुण्यास आल्यावर तेथील पारशी लोकांचीं नाटकें पाहून पुनः नाटकमं. डळी काढ्ण्याविषयीं त्यांच्या मनानें उचल घेतली; व इ. स. १८८० मध्यें आपल्या नांवाची कंपनी स्थापन करून त्यांनी संगीत नाटकांच्या प्रयोगास सुरवात केली. यांना कविता करएयाची स्फूर्ति चांगली असून एकदां घातलेला शब्दू ते बहुधा फिरवीत नसत. यांच्यासंबंधी अशी एक गोष्ट सांगण्यांत येते कीं, सेोभद्र नाटकाचे दोन अंक लिहून झाल्यावर पुढील पदयें कांहीं केल्या मनाजोगीं होईनात ह्मणून कंटाळून त्यांनीं तें काम तसेंच टाकलें. पुढें मुंबईस रस्त्यांतून जात असतां यांना एक कांचेचा गणपती सढ्जीं एका दुकानांत दिसला. त्याला पाहून यांना पुढील पद्यांची अशी कांहीं स्फूर्ति झाली कीं, त्यांनीं पुढीले सर्व अंक हां हां म्हणता लिहिले ! ही गणपतीची कृपा समजून त्यांनीं तो गणपती मुद्दाम विकत घेऊन घरीं आणला व त्याची पूजाअर्चा सुरू केली. हा गणपती बरेच दिवस यांच्या कंपनीत होता. असो; यांनी कंपनी करतां जशीं चांगलीं नाटकें लिहिलीं तसेंच कुंपनींत स्वतः नटाचें काम करूनही चांगला लौकिक मिळविला. यांचें शाड्:खाचें काम प्रेक्ष-