आण्णांच्या मनांत होतें; पण त्यांच्या नशिबीं भलतेंच लिहिलें होतें ! रामराज्यवियोग नाटकाचा पूर्वार्ध संपवून नुकताच कोठं उत्तरार्धास हात घातला होता तोंच दुष्ट र्यमानें झडप घालून त्यांस इहलोकांतून पार उचलून नेलें !* यांच्या मृत्यूनें त्यांच्या कंपनचिाच आधारैस्तंभ नाहींसा झाला असें नाहीं तर संगीतनाट्यकलेच्या कपाळाचें सौभाग्य कुंकूच नाहीसें झालें, असें म्हणण्यास
* रा. आण्णा किलोंस्कर यांचा जन्म बेळगांव जिल्ह्यांतील ' गुर्लद्देोमुर' या गांवीं शके १७६५ चैत्र शु. १ रोजी झाला. बालपणीं यांचा मराठी व कानडी भाषेचा अभ्यास आपल्या गांवीच झाल्यावर ते पुण्यास इंग्रजी शिकण्याकरितां आले. यांचे वडील व्युत्पन्न असल्यामुळे लहान वयांतच यांना संस्कृत भाषेचें थोडेंबहुत शिक्षण मिळालें; व पुढें त्यांतील काव्यनाटकादि ग्रंथांचा यांनीं चांगला अभ्यासही केला. यांना लहानपणापासून कविता करण्याचा नाद होता. यांची कविता सरस असे. एकदां दक्षिणा प्राइझ कमिटीनें ' शिवाजी ' काव्यास बक्षिस लाविलें असतां यांनीं कांहीं कविता करून पाठविल्या होत्या; व त्यांना कांहीं कारणानें बक्षिस मिळालें नाहीं, तरी त्यांवर कमिटीची उत्तम अभिप्राय पडला होता. पुण्यास आल्यावर पौराणिक कथांवर पद्ययुक आख्यानें तयार करून तीं नाटकमंडळीस हे देत. हे सरासरी इंग्रजी पांच यत्ता शिकले. पुढें नाटकाचा छंद अतिशय लागल्यामुळे घरच्या माणसांस न सांगतां शाळा सोडून ते नाटकांत शिरले; व 'भरतशास्त्रोचेजक' नांवाची कंपनी हातीं धरून ते पौराणिक खेळ करूं लागले. पुढें घरच्या मंडळीच्या उपदेशानें त्यांनीं कंपनी सोडून बेळगांवास एका अँग्लो-व्हर्न्याक्युलर-स्कूलमध्यें ३५ रुपयांची नोकरी पत्करली. पुढें कांहीं दिवस त्यांनी