पान:मराठी रंगभुमी.djvu/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०९
भाग २ रा.


वरून काढलेलें चित्र ज्यानें पाहिलें असल त्याला नाटेकरांच्या कण्वाच्या सोंगांत किती भव्यपणा आणि पूज्यता आली आहे हें चांगलें कळून येईल. भाऊराव यांना स्त्रीवेष किती उत्तम दिसत होता हें सांगावयास नकोच. ख्रियांचे अलंकार आंगावर घातल्यावर त्यांचा तो सुंदर चेहरा, ' गोंडस हात व बेोलण्याचालण्याची ढब हीं पाहून थोर कुलांतील सुस्वरूप बायकाही आश्चर्यानें तोंडांत बेटें घालीत! आण्णांनीं नाटकावर खूप पैसे मिळविल्यामुळे नाटकास लागणारे उंची उंची कपडे किंवा सामान याची मुळींच वाण ठेविली नव्हती. एवढेंच नव्हे तर, मंडळींची खासगी व्यवस्था सरदार घराण्याप्रमाणें चैनीची ठेविली होती. एखाद्या श्रीमान् मनुष्याच्या नोकरीस जसे आचारी, शिपाई, न्हावी, परीट, माळी, वगैरे पुष्कळ नोकर असतात तसेच यांच्या मंडळींत अनेक नोकर होते व त्या सर्वांची व्यवस्थाही ठीक असे. यांच्या नाटकांत काम करणारी माणसें व चाकर नोकर कधीं कधीं बक्षिसाबद्दल अगर अशाच दुस-या कोणत्या तरी गोष्टीबद्दल हट्ट करीत, व आण्णांचें मन उदार आणि हात सैल असल्यामुळे ते त्यांचे क्रोडही पुरवीत. सारांश, आण्णांचे नाटकांत कवित्व, गायन, अभिनय, संपाति, सुस्वभाव, आदर, सुव्यवस्था, इ० गोष्टींचा वास असल्यामुळे सर्व बाजूनीं तें ' रॉयल ' होतें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. या नाटकांत उत्तरोत्तर अनेक सुधारणा करण्याचें