पान:मराठी रंगभुमी.djvu/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०४
मराठी रंगभूमि.


शाकुंतल नाटकामध्यें पुष्कळ अंकांत दुष्यंताचेंच एकतारखे काम असल्यामुळे व सहाव्या अंकांत शकुंतलेची स्मृति होऊन त्याचे आत्मगत विचार व मित्राशीं त्याचा दीर्घ संवाद पुष्कळ वेळ असल्यामुळे लोकांना शाकुंतल नाटकाचा प्रयोग केव्हां केव्हां कंटाळवाणा होई. तसें सौभद्र नाटकाचें नव्हतें. त्यांत सुभद्रा, अर्जुन, कृष्ण या पात्रांस साधारणपणें सारखों कामें असून नाटकही शाकुंतलपेक्षां लहान असल्यामुळे लोकांना त्याचा कंटाळा येत नसे. त्यांतून भाऊराव, मोरोबा, नाटेकर यांच्यासारखीं एकाहून एक गाणारीं पात्रे, व दादा मोडकासारखा सांथ करणारा पेटीवाला असल्यामुळे प्रयोगास विलक्षण रंग चढून प्रेक्षकांस "क्षुधा, निद्रा, श्रम, दुःख, कालगति यांचें भान न राहून इतर सर्व कार्याचें विस्मरण पडे, व मन केवळ तलीन होऊन शेवटीं नाटक लवकर संपलें म्हणून त्यास फार वाईट वोटे." या नाटकांत भाऊराव, मोरोबा किंवा नाटेकर यांपैकीं कोण कोणतीं पद्यें उत्तम म्हणत असे याची निवडानिवड करतां येणार नाहीं. प्रत्येकाला जीं पद्यें होतीं तीं तो कसून म्हणूं लागला म्हणजे सगळीं चांगलीं म्हणत असे. तथापेि ज्या पद्यांस लोकांकडून वरचेवर ' वन्स मोअर ' होती असें म्हणण्यास हरकत नाहीं त्यांतील कांहीं येथे नमूद करतों. भाऊराव हे ' झाली ज्याची उपवर