पान:मराठी रंगभुमी.djvu/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०३
भाग २ रा.


लोकाश्रय अवश्य पाहिजे. निदान इतकें तरी खरें की, ज्याप्रमाणे उत्तम पेढेबर्फी तयार करून ती बाजारांत विकण्याचा हलवायास हक्क आहे व असल्या हलवायाच्या दुकानीं गि-हाइकांची दाटी झाली असतां त्याने लोकांस टोपी घातली असें होत नाहीं; त्याप्रमाणेच ज्याच्या अंगीं गाण्याचे किंवा अभिनयाचे कसब आहे त्यानेंही आपल्या गुणावर द्रव्यप्राप्ति करून घेतली तर त्यांत त्यानें कांहीं गैर केलें असें आम्हांस वाटत नाहीं.”* असो; तर किर्लोस्कर कंपनीने निवळ फसवेगिरी करून लोकांस बुचाडले या म्हणण्यांत कांही अर्थ नाहीं. संगीतकला उदयास आणून उत्कृष्ट पात्रांकडून उत्कृष्ट प्रयोग रंगभूमी- वर आणल्याचेंच तें फल आहे ही गोष्ट कोणासही नाकारतां यावयाची नाहीं.
 शाकुंतल नाटकांत दुष्यंत यास फारच पदयें आहेत. म्हणजे चवथा अंक खेरीज करून बाकीच्या सहाही अंकांत त्याचे काम आहेच. अशा कामास मोरोबासारखा दणदकट आवाजीचा मनुष्य होता म्हणूनच तें काम निभावले जात असे. इतरांना तें कठिण गेले असते. कण्वहोणाऱ्या इसमाला मातलीचे काम करण्याची सवड असल्यामुळे हीं दोन्हीं कामें रा. नाटेकर हे बेमालुम रीतीनें करीत असत; व त्यांना दुष्यंताच्या खालोखाल काम पडे. बाकी शाङ्ग्रव वगैरे पात्रांना थोडेंच गाणें आहे.


 * केसरीतील निवडक निबंध भाग १ ला, पान १६५-६६.