Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०५
भाग २ रा.


दुहिता ' हें नटीचें पद्य, व ' अरसिक किती हा शेला,' 'किती सांगु तुला,’ ‘ व्यर्थ मी जन्मलें थोर कुळीं, ' ' ही बहुत छळियलें ’ हीं सुभद्रेचीं पद्ये चांगलीं म्हणत असत; मोरोबा हे ' प्रतिकूल होईल कैसा, ' ' गंगा नदि ती सागर सोडुनी,' 'सुवर्ण केतकी परि जो दिसतो, हीं अर्जुनाचीं पद्ये चांगलीं म्हणत; व नाटेकर ' लझाला जातों मी द्वारकापुरा, ' ' पावना वामना या मना ' हीं नारदाचीं पवें व ‘ परमसुवासिक पुष्पें कोणों, ' ' नच सुंदरी करुं कोपा,' ' प्रिये पहा रात्रीचा, ' हीं कृष्णाचीं पद्ये चांगलीं म्हणत. सौभद्र हें नाटक कृष्णलीलात्मक असून या लीलेसंबंधानें कर्नाटकांत पारिजातादि कानडी भाषेतील खेळांचीं पद्ये आण्णांनीं पुष्कळ ऐकलीं होती. अर्थातू ' बिडोरंगा मरठू’ वगैरे कर्नाटकी चालीवर ' नच सुंदरी करुं कोपा, ' इत्यादि पद्ये रचून तीं उत्कृष्ट पात्रांकडून म्हणविल्यामुळे त्यानेंही प्रयोगास बहार चढून सर्वाना तें नाटक प्रिय झालें.
 आण्णांचें तिसरें नाटक " संगीत रामराज्यवियोग अंक ३” हें होय. हें नाटकही संगीत सौभद्रप्रमाणेच कशाचें भाषांतर नसून पुराणांतील अत्यंत सुरस जी रामकथा तीवर स्वतंत्र रीतीनें रचलें आहे. कलीनें मंथरादिकांच्या देहांत प्रवेश करून त्यांच्याकडून रामराज्याभिषेकास कसा अडथळा केला हें या नाटकांत मुख्यत्वेंकरून दाखविलें आहे. यांत दशरथ, कैकेयी, मंथरा, वसिष्ठ, शंबूक ही