Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१००
मराठी रंगभूमि.


आले कीं, जिकडे तिकडे शुक होऊन मंडळीचें लक्ष प्रयोगाकडे लाग. याचें प्रत्यंतर नष्टीचा वेष घेऊन प्रथमारंभीं ते रंगभूमीवर आले ह्यणजे लेोकांस वेळोवेळीं आलेंच आहे. भाऊरावांचा आवाज पाहाडी व गोड होता तसाच ती पुष्कळ चढतही होता. दोन तीन सप्तकांप र्यंतही ते तान मारीत असत. यांच्या सुस्वर व मोहक गाण्यानें सैाभद्र नाटकांतील सुभद्रेचीं पद्ये लोकांस अत्यंत प्रिय झालीं होती; व शाळेस जाणारे विद्यार्थी किंवा रस्त्यांतील लहानसान पेोरंही तीं पद्ये गुणगुणत जात. उत्सवप्रसंगीं अथवा करमणुकोसाठीं गवई लोकांचीं खासगी गाणों होऊँ लागलों कों, त्यांना हीं नाटकांतील पर्चे ह्मणUयाविषयीं आग्रह होई; व गुलहौसी लोक नाचबैठकींत गुंग झाले असतां सुभद्रेचें एखादं तरी पद्य म्हटल्याशिवाय रंगाजीस विडा मिळत नसे! सनयीवाले, सारंगीवाल व पेटीवाले तर या नाटकाच्या पद्यांसा व्यासंग करूं लागले. एवढेंच नव्हे तर, कथा * कीर्तन अथवा मेजवानी यांचा


 * हल्लीं कथेमध्यें नाटकांतील पद्ये ह्मणण्याचा फारच प्रघात पडला आहे. हीं पद्ये बहुतकरून अलीकडील नवीन धर्तीवरील संगीत नाटकांतील असतात. किर्लोस्करांच्या नाटकांतील कोणी सहसा ह्मणत नाही. याचें कारण ती रागबद्ध असून चांगल्या रीतानें ह्मणावीं लागनात. शिवाय तों भाऊराव, नाटेकर वगैरे सारख्यांच्या तोंडून ऐकल्यामुळें तीं हुबेहुब, निदान त्यांच्या जवळ जवळ तरी वठविल्याशिवाय गोड लागत नाहीत. तथापि,

(पान १०१ पहा)