प्रसंग आला असतां ' झाली ज्याची उपवर दुहिता ' अगर ' रुचती कां तीर्थयात्रा ' अशासारख्या पद्याशिवाय तो साजरा हेोत नसे. आण्णांच्या सैौभद्र नाटकानें लोकांस इतकें कांहीं वेडावून सेडलें होतें कीं, गेरगरीब व वार लावून जेवणारे विद्यार्थी कपडे, पुस्तकें बगूरे विकून रात्रीच्या तिकिटांच्या पैशाची भरती करीत. सौभद्र नाटकाचा प्रयोग बसविल्यावर आण्णांस तर हजारों रुपयांची प्राप्तेि झाली. ही प्राप्ति सहन न होऊनच कीं काय कोण जाणें कित्येक आक्षेपकांनीं आण्णा नाटकाच्या धंद्यावर लोकांस बुडवितात असा त्यांच्यावर आरोप आणला; व कित्येकांनीं तर त्यावरही ताण करून किर्लोस्कर मंडळी म्हणजे प्रति वासुदेव बळवंताचीच कंपनी असें म्हणून तीस दूषणें देण्यास कमी केलं नाहीं पण किलोंस्कर मंडळीनें जो इतका पैसा ओढला तो आपल्या आंगच्या गुणावर ओढला कीं फसवेगिरी करून ओढला याचा त्यांनीं विचार केला
कित्येक हृरिदास त्यांतही बद्वार करितात. हृ. प. रा. शिवरामबुवा इचलकरंजीकर यांची पुण्यांतील लोकांस तर चांगली ओळख झाली आहे. हे नाटकांतील पद्ये सुरेख ह्मणतात; व झणून त्यांचें कीर्तन चाललें असतां पूर्वरंग संपल्याबरोबर 'बुवा, आज सैौभद्र आख्यान लावा ’ ह्राणुन आजूबाजूस जमलेले लोक सूचना करण्यास मार्गे पुढें `पाहृत नाहींते. बुवाही मोठे रंगेल आहेत. लगेच ती सूचना अमलांत आणून नाटकांतील पद्यांत अशी एखादी लकेर मारतात कीं, मंडळीस गोरेगार करून सोडतात!