Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९८
मराठी रंगभूमि.


नाटकाच्या पहिल्या तीन अंकांचा प्रयोग पुण्यांत शनिवार ता. १८ नोव्हेंबर १८८२ रोजीं 'पूर्णानंदनाटकगृहां' त करून दाखविला. सौभद्र हें नाटक शाकुंतल नाटकासारखे संस्कृताचें भाषांतर नसून पौराणिक कथाभागावर आण्णांनीं नवें रचून व नवीं पद्ये घालून तयार केलें आहे. आण्णांच्या आंगचे कवित्वशक्ती व कल्पनाचातुर्य हे दोन गुण या नाटकांत जितके दिसून येतात तितके त्यांच्या दुस-या कोणत्याही नाटकांत दिसून येत नाहीत. त्यांतून कृष्णलीलेसारखा सरस विषय लोकांस अगोदरच आवडत असल्यामुळे या नाटकाची लोकांच्या मनावर चांगलीच छाप पडली. शाकुंतल नाटकापेक्षां या नाटकांत आण्णांनीं पहिली विशेष गोष्ट केली ती ही कीं, स्त्रीपार्टीला गाणें घातलें, ह्मणजे भाऊरावांन सुभद्रेचें काम देऊन त्यांच्या तोंडीं पुष्कळ पद्ये घातली. भाऊराव हे दिसण्यांत सुंदर होते. शिवाय त्यांचा आवाजही गोड होता. पुढें नाटेकर


(९७ पानावरून चालू.)

चांगलें गातां येत्र असून बाप हरिदास असल्यामुळे बापाच्या मार्ग कीर्तनांत तो साथद्दी करीत असे. याला तयें नोकरी होती. मोरोबांनीं ' या मुलास आमच्या नाटकांत देतां का ? ` ह्मणन त्याच्या वाप्रास विचारलें असतां बाष्पानें ती गोष्ट कबूल केली नाही. पुढें मोरोबांनी ' त्याला नाहीं तर नाहीं त्याच्या धाकट्या भावास ( भाऊरावांस ) तरी द्या' असें त्रुटल्यावर त्यानें ती गोष्ट कबूल केली व भाऊरावांस तेथून घेऊन आले. भाऊरावांबद्दल त्च्यायां वडिलास आण्णांनी ५०० रुपये दिले.