Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९७
भाग २ रा.


संगीताकडे जसें लक्ष पुरविलें होतें तसेंच अभिनयाकडेही पुरविले होते. त्यांची गायकपात्रे मूळचीं जशी गाणारी होती तशी ती अभिनय जाणणारी नव्हतीं. त्यांतून कित्येकांस तर लिहिण्यावाचण्याचा संस्कारही बेताबाताचाच झालेला होता. तथापि, त्यांना पढवून सवरून तयार केल्यामुळे भाषणांत किंवा अभिनयांत कोठेही व्यंग दिसत नव्हते.
 आण्णांच्या मनांत पहिल्याने एक वर्षभरच नाटकाचे प्रयोग करून पुण्यातील लोकांचे मनोरंजन करावें असें होतें. स्थायिक कंपनी काढून नाटकाचा धंदा करण्याचा त्यांचा विचार नव्हता. पण पुढे शाकुंतल नाटकाचा प्रयोग लोकांस अत्यंत आवडल्यामुळे व त्यापासून किफायतही होऊ लागल्यामुळे नोकरी सोडून त्यांच्या मनांत तो धंदा करण्याचे भरलें. आतां स्वतंत्र धंद्यास थोडेबहुत भांडवल लागत असते; त्याप्रमाणे त्यांनी ते रा. गुळवे यांचेपासून घेऊन आपल्या कामास सुरुवात केली. नाटकाचा धंद करावयाचा ठरल्यावर त्यांनी त्यास लागणाऱ्या प्रयोगांची व पात्रांची भरती करण्याचे आरंभिलें, व दुसरे वर्षों रा. भाऊराव कोल्हटकर यांना आणवून त्यांनी सौभद्र


 * सुभद्रेचें काम करणारे पात्र कोठें मिळेल या विचारांत आण्णा पूर्वीपासून होतेच, तो त्यांना बडोद्यास एक चांगला गाणारा मुलगा आहे अशी बातमी लागली. मग आण्णांनी मोरोबास मुलाचा शोध करण्याकरितां बडोद्यास पाठविलें. हा बडोद्याचा मुलगा झणजे भाऊरावांचा थोरला भाऊ याला

(पृष्ठ ९८ पहा )