Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६
मराठी रंगभूमि.


रंगभूमीवर आपापल्या आंगच्या गुणांनीं गाण्यामध्यें तीं बहार करून टाकीत. चवथ्या अंकांतील नाटेकरांचें कण्वाचें काम व सहाव्या आणि सातव्या अंकांतील मोरोबांचें दुष्यंताचें काम हीं ज्यानें पाहिलीं असतील त्यांना आमच्या म्हणण्याची सत्यता चांगली कळून येईल. शाकुंतल नाटकांत चवथा अंक सर्वात उत्तम, त्यांत कण्वाच्या तोंडीं उत्तम विचार घातले असून आण्णांनीं ते उत्कृष्ट पद्यांत गोंविलेले, त्यांत नाटेकरासारख्या पात्राच्या तोंडून वेळेस अनुकूल अशा रागरागणींतून बाहेर उतरावयाचे, मग प्रेक्षकजनाचीं मनें आनंदानें तलीन कां होऊं नयेत? ‘जाते कीं मम शकुंतला...','वाडवडिला सेवित जावें...', ‘या विरहा कां भीसी.. ' इ० नाटेकरांनीं म्हटलेल्या पद्यांचा ध्वनेि अद्यापही क्रित्येकांच्या कानांत भरला असेल असें म्हटल्यास त्यांत अतिशयोक्ति मुळीच होणार नाहीं. मोरोबांचेंही काम असेंचं आहे. पहिल्य तीन अंकांत वृंगारयुक्त पद्ये असून संगीत नाटकाच्या रसपारपाकुस अनुकूल अशा पूर्वरागांतच तीं बसविलीं असल्यामुळ त्यांची गाणं मोहक होई; व अखेरच्या तीन अंकांस उत्तररात्र होत असून त्यांतील ' स्वर्गी सर्वही पिंतर माझे ते ' इ. गंभीर विचार ग्राथत केलेलीं पद्ये गंभीर स्वरानें उत्तररागांत म्हटलेलीं ऐकन । ज्याचें चित रममाण इलें नाहीं असा एकड़ी मनुष्य त्या वेळच्या प्रक्षकांत भेटणार नाहीं. असो; शाकुंतल नाटकांत आण्णांनीं