Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९५
भाग २ रा.

भाषांतर करतांना बहुतेक श्लोकांच्या ठिकाणी पद्य आणि गद्याच्या ठिकाणी गद्यच ठेविलें आहे. आतां ताल सुरावरील रागबद्ध पद्ये घालतांना आपल्या नाटकांतील पात्रांचा त्यांनी विशेष विचार केला असावा असे दिसते; व पात्रांचा आवाज आणि ह्मणण्याची तऱ्ह याला अनुसरूनच त्यांनी बहुतेक पद्ये घातली आहेत. ह्मणजे दुष्यंताचे काम करणारे मोरोबा वाघुलीकर, तेव्हां त्यांना लावणीच्या धर्तीवर ह्मणतां येतील अशी पुष्कळ पद्यें घातली आहेत; व नाटेकर गवयी ढंगाने गाणार तेव्हां त्यांना त्याप्रमाणेच पद्यें ठेविली आहेत. आण्णा स्वतः कण्वाचे काम करीत, तेव्हां आपणास ह्मणतां येतील अशी त्यांनी वेगळी पद्ये केली होती व ती शाकुंतल नाटकाच्या पुस्तकांत अखेरीस छापलीही आहेत.
 आरंभी आण्णांनी शाकुंतल नाटकाचे चारच अंक बसवून त्याचा प्रयोग केला, व पुढे तें साग्र बसविलें. आतांप्रमाणे त्या वेळी सुरांची भरती करण्यास: पेटी*[] नसल्यामुळे तंबुरे आणि सारंग्या लावून सुरांची भरती करीत, व त्यांच्या नाटकांत त्या वेळच्या बहुतेक पात्रांना शास्त्रोक्त रीतीने गाण्याची पद्धत माहित असल्यामुळे

  1.  या वेळी नाशिककर हरिदासबुवांच्या मागें मात्र एक सुरांची पेटी होती. याखेरीज दुसरी पेटी पुण्यास कोठे दृष्टीस पडत नव्हती. आतां पेट्या इतक्या झाल्या आहेत की, तिच्या शिवाय तमाशही अडूं लागले आहेत!