पान:मराठी रंगभुमी.djvu/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९१
भाग २ रा.


त्यानें म्हटलेलीं पद्ये * व तारामतीच्या शोकाचीं पद्ये हीं सरस असून या नाटकाचे प्रयोगही प्रेक्षणीय हेात होते असा उल्लेख आहे. ' हिंदुसन्मार्गबोधकमंडळी ' वरील दोन नाटकांखेरीज सौरीविक्रम, वेणीसंहार वगैरे नाटकांचेही प्रयोग करीत असे. असो; वर सांगितलेल्या हकीकतीवरून संगीताचें आद्यकर्तृत्व रा. त्रिलोकेकर यांजकडे जरी येतें तरी ती चाल जारीनें प्रचारांत आणून नांवारूपास चढविण्याचें श्रेय रा. बळवंत पांडुरंग ऊर्फ आण्णा किलोंस्कर यांजकडेच आहे.

किलोंस्कर नाटकमंडळी.

 रा. आण्णा किर्लोस्कर हे उत्तम गवयी होते असें नाही; तथापि, ते गाण्याचे मर्मज्ञ आणि रासिक असून काव्यकल्पनेमध्यें निपुण आणि साधी व सुलभ पद्यरचना करण्यांत कुशल असल्यामुळे त्यांनीं संगीत नाटकाच्या प्रयोगास एक प्रकारचें मोहक स्वरूप आणून दिलें. यांचे वडील व्युत्पन्न असून त्यांच्या सहवासानें आणि शिक्ष


 * रा. त्रिलोकेकरांच्या सरस पद्याचा मासला आमच्या वाचकांस पढावयास मिळावा ह्मणून राजा हरिश्चंद्र श्रीक्षेत्र वाराणशांत जाऊन आपणास खूीपुत्रासह विकत घ्या ह्मणून जनाची प्रार्थन करिती तें पद्य येथें देतें:-
 मुजनहो द्या करा, विनवी जोडुनि करा ॥ ध्रु० ॥
 दोनभार मज सुवर्ण देउनी घ्यावें मज किंकरा ॥ सु० ॥
 एक भार मज हेम देउनी घ्या माझी प्रियकरा ॥ सु० ॥
 अर्ध भार मज हेम देउनी घ्यावें ह्या लेंकरा ॥ सु० ॥ १ ॥